शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चितेगावात एटीएम फोडले परंतु रक्कम सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:22 IST

चितेगाव : औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील इंडिया बँकेचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी गज घालताच सौम्य स्फोट झाला ...

ठळक मुद्देचोरटे हातबल : स्फोटाने एटीएमचा पत्रा निखळला; रक्कम पळविण्याचा अपयशी प्रयत्न

चितेगाव : औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील इंडिया बँकेचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी गज घालताच सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली; परंतु एटीएम मशीनमधून चोरटे रक्कम काढू शकले नाही.चितेगाव येथील संत ज्ञानेश्वरनगरमधील इंडिया बँकेच्या एटीएममध्ये लोखंडी रॉडच्या साह्याने एक लहानसा स्फोट घडवून चोरट्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मशीनचा समोरील लोखंडी पत्रा उखडला; परंतु चोरट्यांना एटीएममधील रक्कम काढता आली नाही. एटीएम मशीन फोडण्यापूर्वी चोरट्यांनी जवळ राहणाऱ्या लोकांच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. एटीएमनजीकच्या रहिवाशांना स्फोट झाल्याचा आवाज आला; परंतु समोरच औरंगाबाद- पैठण मुख्य रस्ता असल्याने त्यांना वाहनाचे टायर फुटल्याचा भास झाल्याने त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. परंतु सकाळी सहा वाजेदरम्यान त्यांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजा लावल्याचे लक्षात आले. घराचा मागील दरवाजा उघडून ते बाहेर आले असता त्यांना सदर एटीएम फोडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना सदरील प्रकाराची माहिती कळविली.सीसीटीव्ही फुटेजचितेगाव येथील एटीएममध्ये स्फोट घडवून तो लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले असून, चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत असले तरी चेहरा अस्पष्ट आहे. सीसीटीव्ही फुटेज घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी केली पाहणीचोरट्यांचा माग काढण्यासाठी औरंगाबाद येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वान रस्त्यावरच घुटमळले. एटीएम मशीनवरील बोटांचे ठसे तज्ज्ञांनी घेतले. याप्रकरणी बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार बलभीम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनिल पवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएम