शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बाल दिन विशेष : देवा, लॉकडाऊनची मज्जा अशीच कायम राहू दे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:46 IST

लॉकडाऊन, कोरोनामुळे जगात असंख्य समस्या निर्माण झाल्या असल्या तरी लहानग्यांचे बालपण मात्र लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने बहरले आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनमध्ये बहरले बालपणमुलांची कौशल्ये होतायेत विकसित

औरंगाबाद : ना शाळेत जायचे, ना आधी इतका अभ्यास करायचा. ना कोणती ट्यूशन, ना पाळणाघराची कटकट..दिवसभर घरीच असणारे आई-बाबा आणि लाड पुरविणारे आजी-आजोबा. त्यामुळे देवा, कोरोना कमी होऊ दे, पण लॉकडाऊनची मज्जा कायम राहू दे, अशी अनेक बालगोपाळांची सुप्त इच्छा आहे.

लॉकडाऊन, कोरोनामुळे जगात असंख्य समस्या निर्माण झाल्या असल्या तरी लहानग्यांचे बालपण मात्र लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने बहरले आहे. १४ नोव्हेंबरला बाल दिन तर दरवर्षीच साजरा होतो; पण घरी असणारे आई-बाबा, सोबतीला दिवाळीची रंगत यामुळे यंदाचा बाल दिन लहान मुलांसाठी निश्चितच अधिक आनंददायी आहे. बाल दिनानिमित्त बच्चेकंपनीशी संवाद साधला असता, लॉकडाऊनचा काळ आमच्यासाठी खूप छान होता. त्या काळात जेवढी धमाल आली, तेवढी आम्ही कधीच केली नाही, असे चिमुकल्यांनी आनंदाने बागडत सांगितले.

लहान मुलांच्या बाबतीत लॉकडाऊनने अनेक सकारात्मक बदल आणले आहेत. लॉकडाऊनमुळे मुलांनी आणि आम्ही पहिल्यांदाच एवढा वेळ सोबत घालविला. त्यामुळे मुलांच्या नेमक्या गरजा, त्यांच्या अडचणी आम्हाला कळू लागल्या, आमचे नाते एका नव्या पद्धतीने बहरू लागले,  नोकरी, व्यवसाय, घरातल्या जबाबदाऱ्या या चक्रात धावताना मुलांचे बालपण नकळत हातून सुटून जात होते, ते आता आम्हाला गवसत आहे, हे अनेक पालकांनी मान्य केले आहे.

आईसोबत करतेय धमालआई दिवसभर घरीच असल्याने अत्यंत सुरक्षित वाटते. कोरोना संपला तर आई पुन्हा ऑफिसला जाणार का, अशी चिंता आता ११ वर्षांच्या ऋजुता थोरात हिला वाटते आहे, तर घरी राहिल्यामुळे माझे आणि माझ्या मुलीचे बाँडिंग दिवसेंदिवस वाढते आहे, आमचे अनुकरण करून ती अनेक गोष्टी नकळत शिकते आहे, असे ऋजुताची आई प्रियंका थोरात यांनी सांगितले. प्रियंका या शिक्षिका असल्याने शाळा आणि घर सांभाळताना मुलीला वेळ देणे शक्य व्हायचे नाही, ते लॉकडाऊनने साध्य झाले, असे प्रियंका म्हणाल्या.

मुलांची कौशल्ये विकसित झालीघरातली सगळी कामे मिळूनमिसळून करायची, सायंकाळची शुभंकरोती, एकमेकांशी संवाद साधायला मिळालेला भरपूर वेळ, घराला सगळ्यांनी मिळून केलेली रंगरंगोटी, ही सगळी कामे लॉकडाऊनमध्ये झाल्याने मुलांची कौशल्ये या काळात खूपच विकसित झाली, असा स्वत:चा अनुभव उद्योजिका प्रतिभा सानप यांनी सांगितला, तर लॉकडाऊनचा काळ आम्ही खूप जास्त मिस करीत आहोत, असे प्रतिभा यांची मुले श्रीया, श्रुती व शिवराज या चिमुकल्यांनी  सांगितले. 

टॅग्स :children's dayबालदिनAurangabadऔरंगाबाद