शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 20:41 IST

महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल.

- राम शिनगारे  

औरंगाबाद : कवी आणि कविता म्हटलं की, एखाद्याचे मोठे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येते. पृथ्वीसह आसमंत व्यापून टाकणारी त्याची शब्दरचना आपल्याला ठाऊक आहे.  महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल. औरंगाबादजवळच्या भिंदोन शाळेत मात्र दप्तरातील कवी आहेत. हो हो.. दप्तरातील कवी. 

डोंगरात वसलेल्या भिंदोन या छोटेखानी वस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे दप्तरातील कवी आहेत. हे कवी म्हणजे शाळेचे अनेक विद्यार्थीच आहेत. अगदी चौथीच्या वर्गापासून ते सातवीपर्यंतचे अनेक विद्यार्थी इथे कवी आहेत. विद्यार्थ्यांच्या या कवितांचा संग्रह नुकताच ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालाय. ‘दप्तरातील स्पंदन’ असे या कवितासंग्रहाचे नाव. विद्यार्थ्यांच्या ६० कविता ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी केला.  

शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भिंदोन हे गाव आहे. या गावात असलेल्या जि.प.च्या शाळेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवीतील विद्यार्थी कविता, कथा, नाटकांची रचना करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांपैकी काही कवितांची निवड करत ‘दप्तरातील स्पंदन’ हा छोटेखानी कवितासंग्रह शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेतून तयार केला. या कवितासंग्रहाचे नुकतेच प.सं. सदस्य अनुराग शिंदे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या बालकवीच्या जाणिवांचा विस्तार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे मातीशी ओलेपण जपणं पाण्याला सांगावं लागत नाही. त्याचप्रमाणे कविमनाचे शिक्षक असतील, तर स्वत:कडील गुण इतरांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. 

यातून शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना कवितांच्या रचना करण्यास प्रोत्साहन दिले. यातून विद्यार्थी कवितांच्या निर्मितीसाठी विचार करू लागले. मानवी जीवनातील संवेदनांच्या बिजारोपणास सुरुवात झाली. विज्ञानाच्या तंत्रासोबतच जगण्याचे मंत्रही आत्मसात करण्याची प्रेरणा यातून विद्यार्थ्यांना मिळत गेली असल्याचे मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, मानसिक विकास व्हावा, आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ कवींना लाजवेल, अशा प्रकारच्या कवितांची रचना केली असल्याचेही राऊत म्हणाल्या. शाळेतील सहकारी शिक्षक  कैलास गायकवाड, अरुणा ठाकुर, प्रतापसिंग जारवाल, रियाज मोहंमद शेख, संजय निकम, रेखा जारवाल, सुलभा मुळे, शिरोडकर, पल्लवी गजेवार, गणेश नलावडे आदींचे सहकार्य लाभले.

२५ मुले कविता करतातभिंदोनच्या शाळेतील २५ मुले कविता करतात. याशिवाय कथा, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता तयार करतात, सामाजिक विषयांवरही लेखन करतात. विद्यार्थी जेव्हा लिहून दाखवतात. तेव्हा त्यातील चुका विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जातात, असेही मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. प्रकाशित झालेल्या ग्रंथात वैशाली काकासाहेब क्षीरसागर (सातवी), शिवकन्या बद्रिनाथ शिंदे (सातवी), प्राजक्ता पांडुरंग पटेकर (सातवी), ऋतुजा राधाकिसन धोत्रे (सहावी), परवेज मुसा शेख (सातवी), महेश भानुदास शिंदे (सातवी), साईराम दिलीप शिंदे (सहावी), आदित्य बाबू आगळे (सहावी), आरती वैजनाथ शिंदे (सातवी) यांच्या कविता आहेत.

टॅग्स :children's dayबालदिनAurangabadऔरंगाबादSchoolशाळा