शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनीचा होणार कल्ला; सिद्धार्थ उद्यानामध्ये पुन्हा झुकझुक आगीनगाडी

By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2023 19:50 IST

यासोबतच शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानातही बसविणार आगीनगाडी 

छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्धार्थ उद्यानात अत्याधुनिक पद्धतीत बॅटरीवर चालणारी रेल्वे बसवली आहे. याचे लवकरच लोकार्पण होईल. त्याचप्रमाणे टी.व्ही. सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातही अशाच पद्धतीची रेल्वे बसविण्यात येणार आहे.

शहरातील सर्वात मोठे उद्यान म्हणजे सिद्धार्थ आहे. या ठिकाणी प्राणिसंग्रहालयही आहे. दररोज ४ ते ५ हजार नागरिक उद्यान, प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. पूर्वी या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी डिझेलवर धावणारी रेल्वे होती. या रेल्वेगाडीचा आवाज बराच येत असत. ज्या ठिकाणी रेल्वे फिरते त्याच्या पाठीमागेच प्राणिसंग्रहालय आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रेल्वेवर आक्षेप घेतला. त्यामुळे चार वर्षांपूर्वी रेल्वे बंद करण्यात आली. बंद असलेली रेल्वे पाहून येणारे नागरिक रेल्वे कधी सुरू होणार, असा प्रश्न उद्यान कर्मचाऱ्यांना करीत होते. शेवटी मनपा प्रशासनाने आवाज न करणारी बॅटरीवर चालणारी रेल्वे आणण्याचा निर्णय घेतला. इच्छुक कंत्राटदाराकडून अर्ज मागविण्यात आले. महापालिकेला २५ टक्के रॉयल्टी देऊन रेल्वे उभारणे, ती चालविण्याची जबाबदारी एका कंत्राटदाराने घेतली. रेल्वे बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. पुढील आठवड्यात लाेकार्पण करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. या रेल्वेत एका चिमुकल्याला २५ रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.

स्वामी विवेकानंद उद्यानया उद्यानातही संबंधित कंत्राटदाराकडूनच नवीन ई-रेल्वे बसविली जाणार आहे. पुढील महिनाभरात हे काम सुरू होईल. मागील अनेक वर्षांपासून सिडको-हडको भागातील नागरिक उद्यानात रेल्वे बसवा, अशी मागणी करीत आहेत. लवकरच ही मागणी पूर्ण होणार आहे.

९ वर्षांपासून रेल्वे उभीसिडको एन-८ येथील बॉटनिकल गार्डन येथे जवळपास ३५ ते ४० लाख रुपये खर्च करून २०१३ मध्ये रेल्वे बसविण्यात आली. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून ही रेल्वे बसविण्यात आली होती. महापालिकेने आजपर्यंत ही रेल्वे चालूही केली नाही. कंत्राटदाराला आजपर्यंत या कामाचा एक रुपयाही देण्यात आला नाही. कंत्राटदाराची फाइलच मनपाने गहाळ करून टाकल्याचे कळते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका