शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुलांनी पाहिली ....‘लोकमत’ची छपाई

By admin | Updated: July 7, 2016 23:56 IST

अनेक प्रश्न बालमनाला पडत असतात. अखेर या सर्व प्रश्नांचे लवकरच ‘लोकमत’तर्फे निरसन करण्यात आले.

औरंगाबाद : आपला आवडता ‘लोकमत’ तर रोज भल्या पहाटे आपल्या घरात येत असतो; पण हा पेपर तयार कसा होतो? त्यावर छपाई कशी केली जाते, पेपरवरचे अक्षर रोजच्या रोज सारखेच कसे काय बुवा? असे अनेक प्रश्न बालमनाला पडत असतात. अखेर या सर्व प्रश्नांचे लवकरच ‘लोकमत’तर्फे निरसन करण्यात आले. निमित्त होते शालेय विद्यार्थ्यांच्या प्रेस व्हिजिटचे. नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना वृत्तपत्र छपाईचे कार्य कसे चालते, याची सफर घडविण्यात आली. शेंद्रा एमआयडीसीमधील ‘लोकमत’चे छपाई युनिट शनिवारी सकाळी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने बहरून गेले होते. वृत्तपत्रांची छपाई कशी काय होते, हे कुतूहल भरल्या नजरेने बालके प्रत्येक यंत्र निरखून पाहत होती. अशातच प्रिंंटिंग प्रेसचा खडखडाट सुरू झाला आणि जमलेल्या बच्चेकंपनीने टाळ्यांचा एकच कडकडाट केला. शहरातील विविध शाळांच्या पाच हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी छपाईचे कामकाज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. याप्रसंगी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई यांची प्रमुख उपस्थिती होती.कागदावर अक्षरे कशी उमटतात, या अक्षरांचा आकार कसा ठरवला जातो, वर्तमानपत्राची यंत्राच्या साहाय्याने कशी घडी घातली जाते, अशा अनेक प्रश्नांची उकल झाली. कुतुहलापोटी तंत्रज्ञांनाही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. मुले उत्सुक तेने वर्तमानपत्र हातात घेऊन पाहत होती. निर्मिती व्यवस्थापक प्रशांत गिते व मधुकर आगलावे यांनी विद्यार्थ्यांना प्रिंटिंग प्रेसमध्ये चालणारे कामकाज समजावून सांगितले. ‘लोकमत’चे वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, शिरीष घायाळ आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसाठी खास जादूचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. जादूचे नवीन प्रयोग पाहून विद्यार्थी अचंबित झाले. कठपुतळीच्या नृत्याचाही मुलांनी आनंद लुटला. ‘लोकमत’मुळे उत्सुकता पूर्ण...पेपर आमच्या घरात येतो, पण तो कसा तयार होतो, याची आम्हाला माहिती नव्हती. आमच्या ज्ञानात भर टाकणारी माहिती आज आम्हाला मिळाली, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर मुलांना वृत्तपत्र छपाईबद्दलची असणारी उत्सुकता आज ‘लोकमत’मुळे पूर्ण झाल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.