शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाल ‘आधार’ नोंदणी रखडली;महिला व बालकल्याण विभागाला मिळालेले १२१ टॅब धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:55 IST

आधार कार्डसाठी मिळालेले टॅब वर्षभरापासून जिल्हा परिषदेत धूळखात पडून

ठळक मुद्दे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची आॅनलाईन नोंदणी सक्तीची पहिल्यापासून नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे.

- विजय सरवदे । 

औरंगाबाद : ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने’ म्हणतात,  अशी गत जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाच्या ‘बाल आधार’ उपक्रमाची झाली आहे. अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या आधार कार्ड नोंदणीसाठी विभागाला वर्षभरापूर्वी १२१ टॅब मिळाले होते. त्यानंतर केंद्र सरकारच्या अधिकृत आधार कार्ड ‘आॅपरेटर’चा कोड नंबर मिळण्यासाठी नोंदणीची नेमकी प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच वेळी ‘आधार’चे सॉफ्टवेअर बदलले. परिणामी, आधार कार्डसाठी विभागाला मिळालेले टॅब वर्षभरापासून जिल्हा परिषदेत धूळखात पडून आहेत.

जिल्ह्यात ३ हजार ५०६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. सुमारे २ लाख ७५ हजार बालके अंगणवाड्यांमधील संदर्भ सेवांचा लाभ घेत आहेत. सद्य:स्थितीत जवळपास ८० हजार बालकांकडे आधार कार्ड आहेत. उर्वरित सुमारे दीड लाख बालकांकडे आधार कार्ड नाहीत. दुसरीकडे ग्रामीण भागात आधार कार्ड नोंदणी करणारी यंत्रणा लवकर पोहोच नव्हती. त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांचे आधार कार्ड अंगणवाड्यांमध्येच काढले जावेत, असे धोरण शासनाचे होते.

अंगणवाड्यांमार्फत बालकांना पूरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. तेव्हा बोगस लाभार्थींना आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने १ एप्रिल २०१८ पासून लाभार्थींची आधार नोंदणी सक्तीची केली. त्यानुसार वर्षभरापूर्वी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचे सहसचिव लालसिंग गुजर यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत जिल्ह्यातील पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्र्तींना समारंभपूर्वक ९७ टॅबचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतरच्या टप्प्यात २५ टॅब व ९६ ‘फिंगर प्रिंट’ यंत्र देण्यात आले. परंतु आधार कार्डच्या अधिकृत आॅपरेटरसाठी पर्यवेक्षिकांनी परीक्षा दिलेली नव्हती. 

अधिकृत आॅपरेटरचा कोड नंबर मिळविण्यासाठी विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्याच वेळी आधार कार्ड नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल झाला. तेव्हापासून ही प्रक्रियाच खोळंबली. आता नव्याने ३३ पर्यवेक्षिकांनी आॅरेटरसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. वर्षभरापूर्वी प्राप्त झालेल्या १२१ टॅब व फिंगर प्रिंट यंत्रांची ‘वॉरंटी’ देखील संपलेली आहे. 

बाल आधार नोंदणी सुरू करणारयासंदर्भात जि. प. महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले म्हणाले की, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची आॅनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामध्ये बालकांचा आधार कार्ड नंबर नोंदविणे अनिवार्य आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्यंतरी सॉफ्टवेअरमध्ये बदल झाला होता. त्यामुळे आॅपरेटरचा कोड नंबर प्राप्त करण्यासाठी आता पहिल्यापासून नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSchoolशाळा