पैठण : आईच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या मुलाचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी पैठण नाथसमाधी मंदिराच्या पाठीमागे घडली.प्रभाकर साळुबा बनसोडे (रा. पिंप्रीराजा, ता. औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे. प्रभाकर बनसोडे हे आपल्या कुटुंबासह शुक्रवारी आईच्या दहाव्याच्या विधीसाठी नाथसमाधी मंदिरामागील गोदावरी नदीच्या पात्रात आले होते. विधी चालू असताना प्रभाकर हे आंंघोळीसाठी गोदावरी नदीच्या पात्रात गेले असता पाण्यात बुडाले. आईपाठोपाठ मुलाचा दुर्दैवी मुत्यू झाल्याने नातेवाईकांत शोककळा पसरली.
आईच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:08 IST