शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिकलठाणा विमानतळाला ‘उडान’मधून वगळले; छोट्या शहरांशीही कनेक्टिव्हिटी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:58 IST

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हवाई कनेक्टिव्हिटी मिळत नाही.

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हवाई कनेक्टिव्हिटी मिळत नाही. परिणामी नव्या विमानसेवा जमिनीवरच राहतआहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी ‘उडान- उडे देश क ा आम नागरिक ’ ही योजना सुरू केली. यामध्ये अधिक विमानसेवा नसणार्‍या विमानतळांवरून एक तासाच्या आतील अंतरावरील शहरांसाठी २,५०० रुपयांत विमानसेवा  देण्यास सुरुवात झाली. देशभरासह महाराष्ट्रातील नांदेड, शिर्डीसह इतर शहरांचा समावेश झाला. या योजनेमुळे बंद असलेली आणि नव्याने सुरू झालेली विमानतळे विमान कंपन्यांना खुणावत आहे. औरंगाबादपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शहरांतील विमानतळे गजबजू लागली आहेत. नांदेड, शिर्डी विमानतळावरून हे चित्र स्पष्ट होत आहे. ‘उडान’मध्ये काही केल्या औरंगाबाद विमानतळाचा समावेश होत नाही. त्यामुळे औरंगाबाद शहर नव्या शहरांबरोबर हवाई सेवेने जोडल्या जात नाही.

ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू केली. परंतु त्यानंतर नव्या विमानसेवेची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवेने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई कनेक्टिव्हिटी आहे. कंपन्यांकडे सध्या मोठी विमाने उपलब्ध नाहीत. कंपन्यांना ही विमाने प्राप्त होताच औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू होईल, असे सांगितले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘उडान’ योजनेत औरंगाबादचा समावेश करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.

या विमानसेवेची गरज‘उडान’ योजनेनुसार तासाभराच्या अंतराचा विचार केला तर मुंबई, गोवा, पुणे, नांदेडसह अन्य शहरे जोडली जाऊ शकतात.  शिवाय सुरतहून शिर्डीसाठी विमान सुरू होऊ शकते, तर औरंगाबादला का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबर औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर- उदयपूर- दिल्ली विमान, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबादसह बुद्धिस्ट सर्किटशी औरंगाबाद शहर विमानसेवेने जोडले जाण्याची प्रतीक्षा आहे. नव्या विमानसेवेसाठी औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. 

जानकार म्हणतात...समावेश व्हावामोजक्याच विमानसेवेमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहे. त्यामुळे  विमानसेवेत वाढ होण्याची गरज आहे. यासाठी ‘उडान’ योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे या योजनेत औरंगाबादचा समावेश झाला पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला पाहिजे. आमच्याकडूनही नियमितपणे प्रयत्न केले जात आहेत.- हरप्रीतसिंग नि-ह, अध्यक्ष, औरंगाबाद हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन

योजना आवश्यकमुंबईला जाण्यासाठी अनेकदा दहा हजार रुपयांपर्यंत तिकीट दर आकारले जातात. त्यामुळे किफायतशीर विमान प्रवासासाठी ‘उडान’ योजना आवश्यक आहे. मुंबई, पुणे, गोवा आदी शहरांना विमानसेवेने औरंगाबाद जोडण्यासाठी हे फायद्याचे ठरेल. या योजनेत समावेश झाला तर विमानतळालाही निश्चित फायदा होईल. - जसवंतसिग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड

टॅग्स :chikhalthanaचिखलठाणाAurangabadऔरंगाबादAirportविमानतळ