शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:15 IST

पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही. उलट मराठवाड्याचा ‘हळूहळू’ सर्वांगीण विकास होतोय असे सांगत नागरिकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी सुरू झालेली आहे. आणखी किती महिने ही कोंडी राहील याचा नेम नाही. सध्या शहरात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. पावसामुळे हा कचरा सडत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.ज्या भागात कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, त्या भागातील नागरिकांना दुर्गंधीने मरण यातनाच सहन कराव्या लागत आहेत. महापालिकेने कचराकोंडी फोडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या, प्रत्येक आघाडीवर अपयश येत आहे. घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून शासनाने आयुक्त म्हणून महापालिकेत डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक केली. मागील दोन महिन्यांत आयुक्तांनाही कचराकोंडीत छाप पाडता आली नाही. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दीर्घ निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कचºयाचा प्रश्न अधिक बिकट आणि जटिल बनला आहे.शहर कचºयाने हैराण असताना शनिवारी मुख्यमंत्री शहरात आले. औरंगाबाद खंडपीठ व पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते कचराकोंडीवर एक शब्दही बोलले नाही. त्यामुळे महापालिकेसह औैरंगाबादकरांचा भ्रमनिराश झाला. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असतानाही त्यांनी कचराकोंडीला सोयिस्करपणे बगल दिली.शहराने भाजपला काय दिले?च्मागील २० वर्षांमध्ये शहराने भाजपला भरभरून दिले आहे. १९९५ मध्ये भाजपचे फक्त ७ नगरसेवक होते. आज ही संख्या २६ पर्यंत गेली. हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांना विधानसभेत पाठविले. खा. रावसाहेब दानवे यांनाही लोकसभेत पाठविण्यासाठी शहराच्या काही मतदारांनी मदत केलीच आहे. एवढे सर्व दिल्यानंतर औैरंगाबादकरांच्या भाजपकडून बºयाच अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcity chowkसिटी चौक