शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

मुख्यमंत्र्यांकडून होणार दुष्काळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 13:21 IST

लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र झाली असून, चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर शहरातही पाणीटंचाई आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र झाली असून, चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर शहरातही पाणीटंचाई आहे. या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ सप्टेंबर रोजी लातूर दौर्‍यावर आहेत. लातूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर तालुक्यांतील काही गावांना ते भेटी देणार आहेत. रविवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी बैठका घेऊन दौर्‍याची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकृत दौरा आला नसला तरी प्रशासनाकडून मात्र जय्यत तयारी सुरू आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.लातूर तालुक्यातील बाभळगाव व पेठ शिवारातील पिकांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस करणार आहेत. त्यानंतर निलंगा तालुक्यातील अंबुलगा व निटूर परिसरातील गावांत मुख्यमंत्री भेट देणार आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ व साकोळ या गावांना भेटी दिल्यानंतर मुख्यमंत्री रेणापूर तालुक्यातील खरोळा, पानगाव आदी गावांना भेटी देणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. २ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर लातूर जिल्ह्यात राहणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) बैठकांवर बैठका..■ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी रविवारी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या. दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत त्यांनी अधिकार्‍यांना काही सूचनाही या बैठकीत केल्या.