शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मंत्रालयात नाहीत, पूर्णकाळ अधिवेशन नाही, असे कितीकाळ चालणार; रक्षा खडसे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 18:41 IST

Raksha Khadase : महिलांना कागदोपत्री नाही तर खरोखर सन्मान द्या. महाराष्ट्रात कुठेही महिला सुरक्षित नाही.

औरंगाबाद : कोरोना काळामुळे शक्ती कायदा करण्यास वेळ नाही मिळाला, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. मात्र, जिथे जनतेचे प्रश्न मांडले जातात ते अधिवेशन सुद्धा पूर्ण काळ होत नाही. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे. मागील दोन वर्षांचा कालावधी कोरोना काळात गेला, हे मान्य. परंतु, मागील सहा महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भाव कमी असताना शक्ती कायद्याबद्दल काहीच कसे झाले नाही ? मुख्यमंत्री, अनेक मंत्री मंत्रालयात येत नाहीत, अधिवेशन पूर्णकाळ होत नाही, असे कितीकाळ चालणार असा संतप्त सवाल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राज्य सरकारला केला.

राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि प्रलंबित शक्ती कायद्या यावर भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आज शहरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, राज्य सरकारच्या दोन वर्षात महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. बीड, परभणी, डोंबिवली, जळगाव येथे लैंगिक अत्याचाराच्या भयंकर घटना घडल्या आहेत. शक्ती कायदा करण्याचे जाहीर झाले मात्र आणखी तो अस्तित्वात आला नाही. महिलांना कागदोपत्री नाही तर खरोखर सन्मान द्या. महाराष्ट्रात कुठेही महिला सुरक्षित नाही. महिला सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पोलीस स्टेशनमध्ये महिलांना अतिशय खराब पद्धतीने वागणूक दिली जाते. महिला अत्याचारात अधिक प्रश्न न विचारता पोलिसांनी थेट एफआयआर दाखल करावा. मात्र, सरकार मागे असल्यानेच पोलीस यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केला. 

केंद्र सरकार कायदे बनवते. तर राज्य सरकारची पोलीस यंत्रणा ती राबवते. मात्र राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने पोलीस महिला अत्याचारावर ठोस कारवाई करत नाहीत. युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही अत्याचाराचा आरोप आहे, अशा प्रकरणात सामान्य माणसावर लगेच पोलिसांनी कारवाई केली असती. अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे महाविकास आघाडीने थांबले पाहिजे, असेही खा. खडसे यावेळी म्हणाल्या. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद