शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन; शहरात वाहन रॅली; २ ठिकाणी जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 19:34 IST

सिल्लोड, वैजापूर येथे जाहीर सभा, तर औरंगाबादेत वाहन रॅली

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात बंडखोर शिंदे गटाकडून ३० आणि ३१ जुलै रोजी शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे ३० जुलै रोजी तर ३१ जुलै रोजी सिल्लोड येथे जाहीर सभा आणि शहरात वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील पाच आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात आणि शहरात दौरा करून शक्तिप्रदर्शन केले. तेव्हापासून शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली होती. ३० आणि ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन होईल. वैजापूर आणि सिल्लोड येथे त्यांच्या जाहीर सभा होतील, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ते रोड शो करून शक्तिप्रदर्शन करतील.

...असा असेल मुख्यमंत्र्यांचा रोड शोहर्सूल टी पॉईंट येथून हा रोड शो सुरू होईल. यानंतर टी. व्ही. सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा रोड शो जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भडकलगेट येथे जाईल. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शो क्रांतीचौकात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या रोड शोचा समारोप होईल. यानंतर ते आ. जैस्वाल आणि आ. शिरसाट यांच्या निवासस्थानी भेट देतील.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारSanjay Shirsatसंजय शिरसाटAurangabadऔरंगाबाद