शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबाला’ पॅटर्नच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतले जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:34 IST

ऊस तोडणीला आई-वडिलांसोबत गेलेल्या विद्यार्थ्यांना फडातून परत आणून प्रशासनाने शाळेत दाखल केले आहे.

ठळक मुद्देऊसतोड मजुरांचे पाल्य राहतात उसाच्या फडातून आणलेल्या विद्यार्थ्यांच्या जाणून घेतल्या समस्या

औरंगाबाद : ऊस तोडणीला आई-वडिलांसोबत गेलेल्या विद्यार्थ्यांना फडातून परत आणून प्रशासनाने शाळेत दाखल केले आहे. यासाठी अंबाला येथे ऊसतोड मंजुरांच्या पाल्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. दिवाळीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंबाला येथील वसतिगृहाला सायंकाळी ८ वाजता भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या.

ऊसतोडणीला जाण्यापासून परावृत्त केलेले ३३० विद्यार्थी कन्नड तालुक्यातील अंबाला येथील शाळेत आहेत. यातील १४८ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था अंबाला गावात करण्यात आली आहे. हे विद्यार्थी ऊसतोडणीसाठी गुजरात, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर आदी ठिकाणी गेले होते. या सर्वांना बालरक्षक पथकांच्या माध्यमातून परत आणण्यात यश आले. दिवाळीनंतर या विद्यार्थ्यांची शाळा सोमवारी (दि.२६) पहिल्यादांच भरली.  याच दिवशी सायंकाळी ८ वाजता जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली.

यावेळी कन्नडचे गटशिक्षणाधिरी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करीत सीईओंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  वसतिगृहातील खोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यानंतर विद्यार्थ्यांसोबत पंगतीमध्ये बसून जेवणाचा आस्वादही त्यांनी घेतला. यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केली होती; मात्र विद्यार्थिनींच्या पंगतीला बसूनच त्यांनी जेवण केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मनस्वी आनंद वाटलामागील अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्याची प्रक्रिया सुरू आहे. याठिकाणी  विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून माझ्या सात महिन्यांच्या औरंगाबादेतील कारकीर्दीत आज  मनस्वी आनंद झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील, असा विश्वास पवनीत कौर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद