शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर जाणारे ‘डायव्हर्जन’ धोक्याचे? दुभाजकामध्ये खोदलेला खड्डा टँकर अपघाताला कारणीभूत?

By विकास राऊत | Updated: February 2, 2024 18:20 IST

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: महापालिका जालना रोडवरील अपघाताच्या ‘स्पॉटचे ऑडिट’ करणार

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलावर जाण्यासाठी असलेले ‘डायव्हर्जन’ (वळण) धोक्याचे, त्यातच पुलाच्या ‘टेकऑफ मेन स्पाॅट’च्या लगत खोदलेल्या खड्ड्याच्या बाजूला काम प्रगतिपथावर असल्याचा बोर्ड पाहून गॅस टँकरचालकाला अंदाज आला नाही व तो पुलाच्या दुभाजकावर धडकल्याचे सकृतदर्शनी बोलले जात आहे.

अशा विचित्र त्रांगड्यामुळे गुरुवारी पहाटे झालेल्या अपघाताने जालना रोडवरील पुलांची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, जालना रोडवरील अपघाताच्या ‘स्पॉटचे ऑडिट’ करणार असून अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी करण्यात येईल, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

पुलाच्या ‘टेकऑफ मेन स्पाॅट’समोर कुठलेही रिफ्लेक्टर नाही. त्यामुळे तेथे पुलावर जाण्याचा रस्ता सरळ आहे की, तिथे अनव्हिसिबल वळण आहे, हे चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा जास्त धोका आहे.

तो खड्डा कुणी खोदला?जालना रोडसह शहरात फुटावर जाहिरात होर्डिंग्जसाठी ग्रॅण्टी लावण्यात येत आहेत. त्यामुळे दुभाजकाच्या मधोमध रातोरात दहा फूट खोल, तीन बाय तीन रुंदीचा खड्डा खोदण्यात येत आहे. या कामाला कोण परवानगी देते. या ग्रॅण्टी अधिकृत आहेत की अनधिकृत, याबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. दरम्यान, मनपा प्रशासकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोडचे ऑडिट करणार...जालना रोडचे पूर्णत: ऑडिट केले जाईल. तसेच गुरुवारी पहाटे झालेला अपघात कशामुळे झाला, याची चौकशीदेखील करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करावी लागेल.-जी. श्रीकांत, मनपा प्रशासक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात