शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

किराडपुरा जाळपोळ: आरोपींच्या शोधार्थ तब्बल २२ पथके; आतापर्यंत ४६ जणांना अटक

By राम शिनगारे | Updated: April 4, 2023 19:59 IST

नागरिकांकडे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज असल्यास देण्याचे पोलिसांचे आवाहन; सहभागी आरोपींची धरपकड सुरु

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरातील दगडफेक, जाळपोळ प्रकरणात आरोपींची धरपकड सुरू आहे. त्यासाठी तब्बल २२ पथके नेमण्यात आली असून, प्रत्येक पोलिस ठाण्यातील एकापेक्षा अधिक पथकांना कामाला लावले आहे. आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे. यातील तीन अल्पवयीन आहेत. आणखी ३८ जणांची ओळख पटली असून, त्यांनी घर सोडून पळ काढला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.

गुप्ता यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात या पथकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना आयुक्त म्हणाले, अटक केलेले आरोपी, त्यांची केस डायरी, संबंधितांच्या विरोधातील सज्जड पुरावे जमविण्यात येत आहेत. पुराव्याशिवाय कोणालाही अटक केलेली नाही. जाळपोळीतील सहभाग असल्यानंतर अटक केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत ४६ जणांना अटक केली आहे. त्यातील तीनजण अल्पवयीन आहेत. आरोपींच्या शोधासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक पथक आणि गुन्हे शाखेची पाच पथके कार्यरत आहेत. यावेळी पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एसआयटीचे प्रमुख निरीक्षक संभाजी पवार, सायबरच्या निरीक्षक प्रवीणा यादव, जिन्सीचे निरीक्षक अशोक भंडारे यांच्यासह १०० पेक्षा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डीसीपींच्या सूचना२२ पथकांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सायबर ठाण्यातील अधिकाऱ्यांना आरोपींची धरपकड करण्याविषयीच्या सूचना पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिल्या. त्याचवेळी आरोपींना पकडण्यासाठी जाताना कोणत्या पद्धतीने कार्यवाही करावी, त्याविषयीची माहिती पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.

नागरिकांकडे व्हिडिओ असतील तर द्यावेकिराडपुरा जाळपोळ प्रकरणातील नागरिकांकडे काही व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज असतील तर त्यांनी पोलिसांना तपासासाठी द्यावे, व्हिडीओ फुटेज देणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांची नावेही पोलिस गोपनीय ठेवतील. जाळपोळ प्रकरणात सहभागी असलेल्यांची ओळख पटवूनच संबंधितांना ताब्यात घेतले जात आहे. त्यासाठी पोलिस अविरतपणे प्रयत्न करीत आहेत.- डॉ. निखिल गुप्ता, पोलिस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद