छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करदात्यांनी मागील आर्थिक वर्षात एकूण २७९२ कोटी ५७ लाख रुपयांची जीएसटी रक्कम राज्याच्या तिजोरीत जमा केली आहे. ही वसुली अपेक्षित २८२३ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या जवळपास म्हणजे ९८.९ टक्के आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी वसुलीत १७.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
किती टक्के जीएसटी आकारला जातोकेंद्र सरकारने देशात जुलै २०१७ पासून ‘वस्तू व सेवा कर’ हा एकच अप्रत्यक्ष कर लागू केला. ४ स्लॅबमध्ये जीएसटी दर विभागले गेले आहेत. यात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के व २८ टक्के असा जीएसटी आकारला जातो.
जिल्ह्यात २७ हजार करदातेराज्य जीएसटी अंतर्गतवार्षिक ५ लाखांपर्यंत जीएसटी भरणारे २२६३८ करदाते आहेत.वार्षिक २४ लाखांपर्यंत जीएसटी भरणारे ३३८० करदातेवार्षिक २५ लाखांपेक्षा अधिक जीएसटी भरणारे ७७२ करदाते.जिल्ह्यात एकूण २६ हजार ७९० करदाते जीएसटी भरतात.
९८ टक्के उद्दिष्टपूर्तीराज्य जीएसटीअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी २८२३ कोटी जीएसटी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी प्रत्यक्षात २७९२ कोटी ५७ लाख एवढे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. एकूण उद्दिष्टाच्या ९८.९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले.
मागील वर्षापेक्षा १७ टक्क्यांनी वाढ२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात २३७८ कोटी ११ लाख रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. त्या तुलनेत यंदा १७.४३ टक्क्याने अधिक म्हणजे २७९२ कोटी ५७ लाख एवढा जीएसटी वसूल करण्यात विभागाला यश आले.
अभय योजनेत ११ कोटी जीएसटी वसुलीजीएसटी विभागाने अभय योजना आणली होती. या योजनेचा फायदा घेत ३४३ जणांनी जीएसटी भरण्यासाठी अर्ज केला होता. याअंतर्गत ११ कोटी ४५ लाख रुपये महसूल प्राप्त झाला. तसेच, ४०५ जीएसटी थकबाकीदारांकडून १२ कोटी ९ लाख रुपये वसूल करण्यात आले.
का उद्दिष्टपूर्ती झाली नाही?जीएसटी उद्दिष्टपूर्ती न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील एक म्हणजे, मागील आर्थिक वर्षात डिसेंबर २०२४ पर्यंत ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये मंदी होती. त्याचा फटका जीएसटी वसुलीला बसला. असे असतानाही २०२३- २०२४ च्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात १७.४३ टक्क्यांनी जीएसटी वाढला आहे.- अभिजित राऊत, सहआयुक्त, जीएसटी विभाग