शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना दिली पदोन्नतीची दिवाळी भेट

By विजय सरवदे | Updated: November 10, 2023 17:52 IST

आदेश निर्गमित : कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद प्रशासनाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सामान्य प्रशासन व आरोग्य विभागातील ५९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी तीन दिवस अगोदरच कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट देणार असल्याची घोषणा केली होती.

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी सायंकाळी संबंधित ५९ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद परिसरात कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सचिव प्रदीप राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ३ कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना सहायक प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली. ६ वरिष्ठ सहायकांना (लिपीक) कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर, १७ कनिष्ठ सहायकांना (लिपीक) वरिष्ठ सहायक (लिपीक) या पदावर पदोन्नती देण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागातील ५ आरोग्य सहायकांना आरोग्य पर्यवेक्षक पदावर, २० आरोग्य सेवकांना आरोग्य सहायक (पुरुष) या पदावर, तर २८ आरोग्यसेवक (महिला) यांना आरोग्य सहायक या पदावर पदोन्नती देण्यात आली.

आश्वासित योजनेचा लाभ प्रतीक्षेतजिल्हा परिषदेचे सुमारे २५० कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेचा (१० वर्षे, २० वर्षे, ३० वर्षे) लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने सर्व विभागांना आवाहन केले आहे की, पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव अद्ययावत करावेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर हे प्रस्तावही निकाली काढले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद