शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांना बदलेलं छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 19:10 IST

तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही.

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर ) : एक वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या आमच्या सरकारने औंरगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचे पहिलं काम केले. मात्र, शरद पवार यांना हे मान्य नसून ते म्हणतात तुम्ही नाव काही करा मी औंरगाबादच म्हणेल; म्हणजे पवारांना छत्रपती संभाजीनगर झालेले नामांतर मान्य नसल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे जल जीवन मिशन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पवारांना उद्देशून बोलतांना फडणवीस पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. एक वर्षांपूर्वी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बदलले व पुन्हा एकदा सर्व सामान्य व शेतकऱ्यांचे सरकार राज्याच्या सत्तेत आले. या एक वर्षभरात अनेक विकास काम झाल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देशात सुबत्ता आणण्याचे काम मोदी सरकारने केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांतील कार्यकाळात विकासात्मक योजनांमधून देशात सुबत्ता आली असून सर्व सामान्य जनतेचे यामुळे कल्याण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली आहे. शेतकऱ्यांनाही वर्षाला सहा हजार रुपये किसान योजनेतून देऊन सरकारने पाठबळ दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली असून लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादSharad Pawarशरद पवार