शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रशीद मामू' फॅक्टर कायम! प्रभाग ४ मध्ये उद्धवसेनेचा भगवा फडकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:00 IST

अंतर्गत विरोध अन् विरोधकांची टीका पचवत रशीद मामू विजयी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ च्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. उद्धवसेनेचे उमेदवार आणि माजी महापौर रशीद मामू यांनी या प्रभागातून विजय मिळवत आपल्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रशीद मामू यांचा हा विजय उद्धवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महायुतीच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

रशीद मामू यांनी निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने उद्धवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, या प्रवेशाला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध होता. खैरेंनी जाहीरपणे रशीद मामू यांना तिकीट मिळू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, अंबादास दानवे यांनी थेट 'मातोश्री'वर नेऊन मामूंचा पक्षप्रवेश घडवून आणला आणि त्यांना तिकीट मिळवून देण्यातही पुढाकार घेतला. आजच्या विजयाने दानवे यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले असून खैरेंसाठी हा एक राजकीय धक्का मानला जात आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदेसेनेने उद्धवसेनेवर 'मामूसेना' झाल्याची जहरी टीका केली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशाला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, रशीद मामू यांनी प्रचारादरम्यान संयम राखत जनसंपर्कावर भर दिला. आजच्या निकालाने प्रभाग ४ मधील मतदारांनी मामूंच्या कामावर आणि अनुभवावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा सभागृहात पाठवले आहे. या विजयामुळे रशीद मामू यांचे शहरातील राजकारणातील स्थान अधिक बळकट झाले असून, उद्धव सेनेतील अंबादास दानवे गटाची ताकदही वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashid Mamu Factor Prevails; Uddhav Sena Wins Chh. Sambhajinagar Ward!

Web Summary : Rashid Mamu's victory in Chh. Sambhajinagar's Ward 4 defied critics, strengthening Uddhav Sena and Ambadas Danve's influence despite internal opposition and Mahayuti's attacks. His win validates Danve's support and bolsters his political standing.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६