छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालांनी आज अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत राजकीय वारसांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मोठे यश मिळवले असून त्यांची दोन्ही मुले विजयी झाली आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव झाल्याने त्यांना हा मोठा सेटबॅक मानला जात आहे. या निकालांमुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतही राजकीय घराण्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शिरसाट कुटुंबाचे वर्चस्व पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. प्रभाग १८ मधून त्यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला, तर प्रभाग २९ मधून मुलगा सिद्धांत शिरसाट विजयी झाला. एकाच वेळी दोन्ही मुले सभागृहात जाणार असल्याने शिरसाट समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जैस्वाल आणि खैरे यांचाही विजयआमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल यांनी प्रभाग १५ मधून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे मिथुन व्यास आणि उद्धवसेनेचे लक्ष्मीनारायण पाखरिया अशा तगड्या उमेदवारांना पराभूत केले. याचसोबत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पुतण्यानेही विजयाची गुलाल उधळला असून, शहराच्या राजकारणात नवीन पिढीची एन्ट्री झाली आहे.
अंबादास दानवे यांना मोठा धक्का या निकालात सर्वात मोठी उलटफेर प्रभाग १६ 'ड' मध्ये पाहायला मिळाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना शिवसेनेच्या (शिंदे गट) मनोज बल्लाळ यांनी पराभूत केले. दानवे यांनी आपल्या भावाच्या विजयासाठी मोठी ताकद लावली होती, मात्र मतदारांनी बल्लाळ यांच्या पारड्यात कौल दिला.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar election results bring mixed fortunes. Minister Shirsat's sons won, while Danve's brother lost. Jaiswal and Khaire's relatives also secured victories, marking a shift in local politics.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर चुनाव परिणामों में मिली-जुली किस्मत देखने को मिली। मंत्री शिरसाट के बेटे जीते, जबकि दानवे के भाई हार गए। जायसवाल और खैरे के रिश्तेदारों ने भी जीत हासिल की, जिससे स्थानीय राजनीति में बदलाव आया।