शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

'मी जबाबदारी स्वीकारतो!'; मुलं विजयी होऊनही शिंदेसेनेच्या पराभवाने संजय शिरसाट व्यथित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:18 IST

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026: 'अंतर्गत राजकारणाचा फटका' बसल्याची संजय शिरसाट यांची कबुली

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे. तर दुसरीकडे स्वबळावर लढलेल्या शिंदेसेनेला मोठा फटका बसला आहे. या अनपेक्षित निकालांनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. "पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, याची जबाबदारी मी स्वीकारतो," असे म्हणत त्यांनी अंतर्गत राजकारण आणि बदललेल्या जातीय समीकरणांकडे अंगुलीनिर्देश केला.

मुलं जिंकली तरी मन अस्वस्थ या निवडणुकीत संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा आणि मुलगा सिद्धांत या दोघांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र, या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. "माझी मुलं निवडून यावीत हे माझे टार्गेट कधीच नव्हते, पक्ष जिंकणे हे महत्त्वाचे होते. मुलं जिंकली याचा आनंद नाही, पण पक्षाचं नुकसान झालं याचं जास्त दुःख आहे," असे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

पराभवाची 'पोस्टमॉर्टम' कारणे शिरसाट यांनी पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले की, "प्रभाग पद्धतीमुळे जातीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. गुलमंडी हा आमचा पारंपारिक गड होता, पण तिथेही एमआयएमने मुसंडी मारली. अंतर्गत राजकारण, बदल्या आणि ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला हवे होते तिथे दुर्लक्ष झाल्याचा फटका आम्हाला बसला आहे. एखाद्या वेळेस अशी लाट येते की त्याला सामोरे जावेच लागते."

भाजप आणि विरोधकांवर भाष्य भाजपच्या एकहाती सत्तेवर बोलताना ते म्हणाले की, "भाजपची सत्ता आली यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. अनेक ठिकाणी तेच चित्र आहे. युती झाली असती तर काय झाले असते, या चर्चेला आता अर्थ नाही." तसेच एमआयएमबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, एमआयएम २५ च्या पुढे जाईल ही भीती मी आधीच व्यक्त केली होती आणि दुर्दैवाने तेच घडले. मुंबईच्या निकालावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर टोला लगावला. "मुंबई तोडणार ही एकच कॅसेट लोकांनी नाकारली असून विकासाला पसंती दिली आहे," असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirsat accepts responsibility despite children's win, saddened by party loss.

Web Summary : Sanjay Shirsat accepts responsibility for the party's poor performance in the municipal elections, despite his children winning. He cited changing demographics, internal politics, and strategic oversights as contributing factors. He acknowledged BJP's victory and criticized Uddhav Thackeray's campaign in Mumbai.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Sanjay Shirsatसंजय शिरसाट