शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरसह राज्यात एमआयएमचा 'ग्रँड' विजय!; इम्तियाज जलील म्हणाले, 'भाजपला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:31 IST

"भाजपनेच शिंदेसेनेला संपवलं" इम्तियाज जलील यांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने ३३ जागा जिंकून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या निकालाने शहराच्या राजकारणाची सर्व समीकरणे मोडीत काढली आहेत. विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपवर कडाडून टीका केली, तर शिंदेसेनेच्या पराभवावर खोचक भाष्य केले.

"भाजपला शिंदेसेना संपवायची होती"इम्तियाज जलील यांनी भाजपच्या रणनीतीवर मोठा दावा केला. "भाजपकडे ताकद आणि सत्ता होती. त्यांना शिंदेसेना संपवायची होती, म्हणूनच ते ऐनवेळी एकटे लढले आणि त्यांचे हे ध्येय यशस्वी झाले," असे जलील म्हणाले. शिंदेसेनेकडे मंत्री, खासदार आणि सहा आमदार असूनही त्यांना यश मिळाले नाही, आता ते आमच्या मागे फेकले गेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

जातीयवादाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर "आमच्यावर नेहमी जातीयवादाचा आरोप केला जातो, पण आज आम्ही दलित, हिंदू आणि आदिवासी उमेदवारांना निवडून आणून दाखवले आहे. आम्ही केवळ एका समुदायाचे पक्ष नाही, हे या निकालाने सिद्ध केले आहे," असे जलील यांनी ठामपणे सांगितले. एमआयएम आता महापालिकेत प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागत असतील, तर भाजपला समर्थन देण्याचा विचार करू, असे सूतोवाचही त्यांनी केले.

ओवीसींना दिलेल्या शब्दाची पूर्तता मागच्या वेळी एमआयएमचे २५ नगरसेवक होते. "मी असदुद्दीन ओवीसी यांना २८ जागांचा शब्द दिला होता, पण जनतेने आम्हाला ३३ जागा देऊन मोठा आशीर्वाद दिला आहे. हैदराबाद नंतर आता देशात छत्रपती संभाजीनगरने एमआयएमला आपले मानले आहे," अशा शब्दांत जलील यांनी जनतेचे आभार मानले.

छत्रपती संभाजी नगर अंतिम निकाल: ११५भाजप  : ५८एमआयएम :  ३३शिंदेसेना:  १२उद्धवसेना:  ६वंचित बहुजन आघाडी: ४काँग्रेस : १राष्ट्रवादी शप :  १राष्ट्रवादी अप: 0

English
हिंदी सारांश
Web Title : MIM's 'Grand' Victory in Chhatrapati Sambhajinagar; Jaleel Targets BJP.

Web Summary : MIM won 33 seats in Chhatrapati Sambhajinagar, surprising many. Imtiaz Jaleel criticized BJP's strategy and taunted the Shinde Sena's defeat. He refuted allegations of communalism, emphasizing inclusivity.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Imtiaz Jalilइम्तियाज जलील