शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर महापालिका ११ हजार घरे बांधणार; ऑनलाईन अर्जास झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:43 IST

अर्जदाराला आता घर कुठे पाहिजे, पाच हजार रुपये अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेत महापालिका ११ हजार १२० घरे बांधून देणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वर्धापनदिनापासून म्हणजेच ८ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत आहे. अर्जदाराला आता घर कुठे पाहिजे, पाच हजार रुपये अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.सुंदरवाडी गट क्र. ९ व १०, तिसगाव येथे गट क्र. २२५/१ व २२७/१, पडेगाव येथे गट क्र. ६९, हर्सूल येथे गट क्र. २१६ अशा चार ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ११ हजार १२० घरे बांधण्यात येत आहेत. 

‘म्हाडा’प्रमाणे घरकुल वाटपासाठी लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. महापालिकेकडे आतापर्यंत ४० हजार लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले. आता पुन्हा एकदा लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. मनपाचा ८ डिसेंबरला वर्धापन दिवस असून, त्या दिवशीही ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा आहे. त्यासाठी शनिवारी मनपाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाइन अर्जामध्ये अर्जदाराची माहिती, विविध कागदपत्रे, बँक डिटेल्स, पाच हजार रुपये अनामत आदी माहिती मागविण्यात येणार आहे. घर कुठे पाहिजे, याचाही उल्लेख अर्जात करावा लागेल. अर्ज भरण्यासाठी ७०९ रुपये खर्च येईल. एका सदनिकेचे चटई क्षेत्र ३२२ चौरस फूट राहणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत केंद्र आणि राज्य शासनाचे २ लाख ६० हजार रुपये सदनिकेच्या किमतीत कमी करण्यात येतील.

कोणत्या प्रकल्पात किती घरे?प्रकल्प ठिकाण------------------- किंमत -------------------घर संख्यापडेगाव गट क्र. ६९---------------- ९ लाख ५६ हजार -------------६७२सुंदरवाडी गट क्र. ९ व १० ---------- ९ लाख २६ हजार------------- ३,२८८तिसगाव गट क्र. २२५/१-------------९ लाख २६ हजार ------------- १,९७६तिसगाव गट क्र. २२७/१---------- ९ लाख ४४ हजार--------------४,६८०हर्सूल गट क्र. २१६----------------- ९ लाख ४४ हजार --------------५०४एकूण-------------------------- ११,१२०

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Corporation to Construct 11,000 Houses; Online Applications Open

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will construct 11,120 houses under the Pradhan Mantri Awas Yojana. Online applications, with a ₹5,000 deposit, started December 8th. Lottery system for beneficiary selection, like MHADA. Projects are located in Sundarwadi, Tisgaon, Padegaon, and Harsul.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Corporationनगर पालिका