शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

मुंबईतील विमानांच्या गर्दीचा फटका छत्रपती संभाजीनगरला, मुंबईचे विमान मार्चपासून ‘जमिनीवर’

By संतोष हिरेमठ | Updated: February 15, 2024 19:25 IST

हवाई कनेक्टिव्हिटीत होणार घट : प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना बसणार फटका

छत्रपती संभाजीनगर : सकाळच्या वेळेतील एअर इंडियाची मुंबई - छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमानसेवा १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन प्रणालीत ही विमानसेवा काढूनही टाकण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी उड्डाण घेणारे एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील शेवटचे विमान ठरणार आहे. त्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट होणार असून, प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे.

विमानांची गर्दी कमी करण्यासाठी आणि वेळेवर उड्डाण होण्यासाठी सरकारने मुंबई विमानतळाला नियोजित उड्डाणांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. या निर्णयाचा छत्रपती संभाजीनगरला फटका बसला आहे. सध्या इंडिगो आणि एअर इंडियाच्या माध्यमातून मुंबईसाठी सकाळी दोन आणि सायंकाळी एक, अशा एकूण तीन विमानसेवा सुरू आहेत. तिन्ही विमाने प्रवाशांच्या गर्दीने ‘फुल्ल’ असतात. मात्र, आता एअर इंडियाचे विमान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मार्चपासून मुंबईसाठी सकाळी एक आणि सायंकाळी एक, अशी दाेनच विमाने उपलब्ध राहणार आहेत.

टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने दिलेले निवेदन....

ज्योतिरादित्य सिंधिया, नागरी विमान वाहतूक मंत्री, नवी दिल्लीमुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई मार्गावरील एअर इंडियाच्या विमानाचा सकाळचा स्लॉट कायम ठेवावा. कारण, या सेक्टरवरील फ्लाइट्समध्ये कपात केल्यास अनेक परदेशी पर्यटकांच्या आगामी प्रवासाचे नियोजन विस्कळीत होईल. पर्यटकांचे ग्रुप, कॉर्पोरेट क्लायंट, व्यावसायिक, आगामी दिवसातील परिषद, विद्यार्थ्यांच्या प्रवासावर परिणाम होईल. अनेकांनी मार्च, एप्रिल आणि त्यापुढील महिन्यांतील प्रवासासाठी अनेक महिने अगोदर त्यांच्या जागा बुक केल्या आहेत. उड्डाणे कमी करण्याच्या या शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाचा केवळ पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रावरच नाही, तर छत्रपती संभाजीनगर शहर आणि आसपासच्या व्यापार, वाणिज्य आणि उद्योगावरही वाईट परिणाम होईल.

पर्यटन, व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व भागधारकांच्या हितासाठी मुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई सेक्टरवरील एअर इंडियाच्या फ्लाइटचा सकाळचा स्लॉट पुन्हा द्यावा.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन