शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

छत्रपती संभाजीनगर विभागाची बारावीनंतर दहावीतही घसरण; राज्यात सातव्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:34 IST

बीड जिल्हा अव्वल, हिंगोली आणि परभणीच्या निकालात घसरण; तर ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के, तर ९ शाळांचा शून्य टक्के

छत्रपती संभाजीनगर : बारावीनंतर दहावी बोर्ड परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागाची राज्यात घसरण झाली. विभागाचा दहावीचा निकाल ९२.८२ टक्के लागला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये संभाजीनगर विभाग ७ व्या स्थानी आहे. विभागातील ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के तर ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे आणि सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर माहिती दिली. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांची उपस्थिती होती.

छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील ६४४ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९२.८२ टक्के आहे. गतवर्षी विभागाचा निकाल ९५.१९ टक्के होता. विभागात ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. यात परभणी जिल्ह्यातील ५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ तर हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका शाळेचा यात समावेश आहे.

७१ विद्यार्थ्यांवर कारवाईकॉपीमुक्त अभियानात ३७ विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब करताना आढळले. परीक्षोत्तर ४७ विद्यार्थ्यांनी गैरमार्ग अवलंबल्याचे दिसले. अशी ८४ प्रकरणे बोर्डासमोर सुनावणीस आली. सुनावणीअंती १३ विद्यार्थी निर्दोष आढळले. उर्वरित ७१ प्रकरणातील विद्यार्थ्यांची संबंधित विषयातील संपादणूक रद्द केली.

जिल्हानिहाय निकालजिल्हा - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारीछत्रपती संभाजीनगर - ६२३३६ - ९३.६०बीड - ४००७७ - ९६.४७परभणी - २५५१६ - ८९.२४जालना - २८८८३ - ९१.४४हिंगोली - १३९०८ - ८९.०७---------------------एकूण - १७०७५० - ९२.८२

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र