शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दडलेत पर्यटनाचे अनेक माणिकमोती; कोणी पाहणार का?

By संतोष हिरेमठ | Updated: January 25, 2024 15:24 IST

संवर्धन अन् पर्यटकांच्या प्रतीक्षेत दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू अन् पर्यटनस्थळे

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पर्यटननगरीत दरवर्षी हजारो देश-विदेशातील पर्यटक येतात. परंतु, शहर आणि जिल्ह्यातील ५ ते ६ स्थळांपर्यंतच पर्यटक पोहोचत आहेत. यापेक्षा कितीतरी अधिक ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळांचे वैभव जिल्ह्यात आहे. दडलेली माणिकमोतीरूपी ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित झाली आहेत. संवर्धन अन् पर्यटनवाढीसाठी शासन आणि पर्यटकांची जणू प्रतीक्षाच या वास्तू करीत आहेत.

दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटनदिन साजरा करण्यात येतो. वेरुळ, अजिंठा, बीबी का मकबरा, देवगिरी (दौलताबाद) किल्ला, पाणचक्की, औरंगाबाद लेणी या ठिकाणांवरच पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतो. मात्र, याशिवाय जिल्ह्यात अनेक स्थळे आहेत. यातील काही स्थळांचा पुरातत्त्व विभागाकडून नावालाच सांभाळ केला जात आहे, तर काही स्थळे अजूनही कोणाच्या नजरेत आलेली नाहीत. घटोत्कच लेणी, रुद्रेश्वर लेणी, औरंगाबाद लेणीचा तिसरा भाग आजही दुर्लक्षितच आहे.

दौलताबाद घाटात लेणीसारख्या गुहादौलताबाद घाट सुरू होण्यापूर्वी केसापूर तांडा रस्त्याच्या बाजूने असलेल्या डोंगरात लेणीसारख्या गुहा आहेत. या गुहा आजही कोणाच्या नजरेत आलेल्या नाहीत.

बनी बेगम बागखुलताबादमध्ये बनी बेगम बाग आहे. हे सुंदर ठिकाण पर्यटकांच्या आणि संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य संरक्षित स्मारक असूनही या स्थळाविषयी माहिती देणारा फलक पर्यटकांना शोधावा लागतो.

शहराच्या रचनाकाराची कबर दुर्लक्षितखुलताबादकडे म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुन्या छत्रपती संभाजीनगर शहराचे रचनाकार मलिक अंबर यांची कबर आहे. कबर असलेला मकबरा आणि घुमट आजघडीला काळवंडलेला आहे. ठिकठिकाणी पडझड झालेली आहे. माहिती देणारा फलकही नाही.

अब्दीमंडी परिसरातील हे स्थळ कोणी पाहिले का?अब्दीमंडी परिसरात चार घुमट आणि एक मुख्य प्रवेशद्वार असलेले स्थळ दुर्लक्षित झालेले आहे. झाडाझुडपांच्या विळख्यात हे स्थळ हरवले आहे. जाण्यासाठी रस्ताही नाही.

जिल्ह्यात हे ८ किल्ले माहीत आहेत?किल्ला म्हटला की दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचे नाव निघते. मात्र, जिल्ह्यात एक-दोन नव्हे, ८ किल्ले आहेत. अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगांत हे किल्ले आहेत. अंतूर किल्ला (कन्नड, गौताळा अभयारण्य), जंजाळा किल्ला, सुतोंडा किल्ला, वेताळवाडी किल्ला, लहूगड नांद्रा, भांगसीमाता गडकिल्ला आणि लोंझा किल्ला जिल्ह्यात आहे.

पर्यटनवाढीसाठी प्रयत्नपर्यटनवाढीसाठी पर्यटन संचालनालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ३० कृषी पर्यटन केंद्रेही सुरू आहेत.- विजय जाधव, उपसंचालक, प्रादेशिक कार्यालय, पर्यटन संचालनालय

विविध उपक्रम हवेतपर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. फिल्म टूरिझम, स्पोर्ट्स टूरिझम, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन यांनाही चालना मिळाली पाहिजे.- जयंत गोरे, अध्यक्ष, मराठवाडा टूरिझम विकास संघटना

दुर्लक्षित लेणीसिल्लोड तालुक्यातील घटोत्कच लेणी ही दुर्लक्षित बौद्ध लेणी आहे. तिकडे जाण्यासाठी रस्ता नाही. अनेक अभ्यासक या लेणीचा अभ्यास करण्यासाठी येतात, पण रस्ता नसल्याने खूप त्रास सहन करावा लागतो. खुलताबाद येथे मलिक अंबर यांच्या कबरीचे सुशोभीकरण केले पाहिजे. शहरातील खंडोबा मंदिरही अनेक लोकांना माहिती नाही.- डॉ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था

पर्यटननगरीत किती पर्यटक भेट देतात?

बीबी का मकबराकालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक२०१९ ते २० - ११,१३,४५२-९,५४०२०२० ते २१ - १,८०,१४८-४८२०२१ ते २२ - ३,४६,५७८-३३७२०२२ ते २३ - ११,६१,८०२-४,७१४२०२३ ते डिसेंबर २०२३- १२,५१,९२६-४२११

वेरूळ लेणीकालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक२०१९ ते २०- १२,५५,८६५-२१,४०७२०२० ते २१- १,२०,२८३-८२२०२१ ते २२- ३,४८,३४९-६०५२०२२ ते २३- १४,१५,८२८-१०,७४४२०२३ ते डिसेंबर २०२३ -१२,५१,४७३-८९३३

अजिंठा लेणीकालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक२०१९ ते २०- २,७३,३४४-१५,८९८२०२० ते २१- ४०,१८७-५५२०२१ ते २२- १,१४,९१७-४०९२०२२ ते २३- ३,९३,९२८-६,९६७२०२३ ते डिसेंबर २०२३- ३,२१,१९०-६७८८

देवगिरी किल्ला (दौलताबाद किल्ला)कालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक२०१९ ते २०- ४,६५,१६८-४,१७३२०२० ते २१- ९३,३९०-४७२०२१ ते २२- १,७९,५१२-१६६२०२२ ते २३- ९,८३,८११-४,१२३२०२३ ते डिसेंबर २०२३-३,८८,३१७-१७९५

औरंगाबाद लेणीकालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक२०१९ ते २० - १,२७,६६४-१,६५५२०२० ते २१ - ३०,६०८-४२०२१ ते २२ - ६२,१८१-६०२०२२ ते २३ - १,१२,५७८-७०२२०२३ ते डिसेंबर २०२३-९५,९६५-९१५

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन