शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खांदेपालट

By राम शिनगारे | Updated: May 30, 2023 11:36 IST

वाळूज एमआयडीसी व गुन्हे शाखेच्या निरीक्षकांमध्ये आदलाबदल

छत्रपती संभाजीनगर : आयुक्तालयात नव्याने दाखल सहायक पोलिस आयुक्तांच्या पदस्थापनेसह सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली. वाळूज एमआयडीसीचे वरिष्ठ निरीक्षक संदीप गुरमे यांची गुन्हे शाखेत तर गुन्हे शाखेतील अविनाश आघाव यांना त्यांच्या जागेवर पाठविले आहे. नियंत्रण कक्षात संलग्न केलेले वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना उस्मानपुरा पोलिस ठाणे दिले. बदल्याचे आदेश पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी रात्री उशिरा काढले आहेत.

सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांना शहर विभाग, साईनाथ ठोंबरे यांना सिडको विभाग, धनंजय पाटील यांना गुन्हे शाखा, रणजित पाटील यांना उस्मानपुरा विभागाचा पदभार देण्यात आला. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ यांची विशेष शाखेत बदली केली. पोलिस निरीक्षकांमध्ये गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांची एम. वाळूज ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक झाली तर निरीक्षक संदीप गुरमे यांना गुन्हे शाखा देण्यात आली. विठ्ठल पोटे यांची सीटीचौक, वाळूज वाहतुक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बेगमपुरा, गिता बागवडे यांची वाळूज, अशोक गिरी यांची उस्मानपुरा, सचिन इंगोले यांची वाळूज वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्याशिवाय एम. वाळुजचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, वेदांतनगरचे ब्रम्हा गिरी आणि सायबरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांची तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्ती त्याचठिकाणी पूर्णवेळ केल्याचेही आदेशात म्हटले आहे.

किराडपुऱ्यातील कामाचे बागवडेंना बक्षीस?किराडपुरा भागात जाळपोळीच्या घटनेमध्ये जमावाला सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गिता बागवडे यांना वाळूज पोलिस ठाणे देत त्यांना पोलिस आयुक्तांनी बक्षीसच दिले. तर गुन्हे शाखा व एम. वाळूज पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची आदलाबदलच होणार ही अटकळ मागील पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळापासून बांधली जात होती. नवीन पोलिस आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसTransferबदली