शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे पथविक्रेता धोरण ठरेना; ४,५०० हातगाड्या जप्त, हॉकर्स बांधवांनी पोट कसे भरावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:55 IST

मनपाचे अजब धोरण :  गरीब हातगाडी चालक विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांकडे हातगाडी मिळवून द्या म्हणून आग्रह धरतात. त्यांच्या विनंतीलाही मनपा प्रशासन मान द्यायला तयार नाही.

छत्रपती संभाजीनगर : शासन आदेशानंतरही महापालिका प्रशासन पथविक्रेत्यांसाठी धोरण आखायला तयार नाही. रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ४ हजार ५०० पथविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे दंड लावून हातगाड्या परत देण्याचा नियम असतानाही त्या परत दिल्या नाहीत. अत्यंत गरीब हातगाडी चालक आजही आपली गाडी मिळावी म्हणून मनपा मुख्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी आपल्या शटरपासून पाच ते दहा फुटांपर्यंत अतिक्रमण केले आहे. त्यानंतर रस्त्यावर हातगाड्या उभ्या असतात. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. मागील वर्षभरात महापालिकेने साडेचार हजार हातगाड्या जप्त केल्या. त्यामुळे शहरातील रस्ते मोकळे झाले का? शहर हॉकर्स फ्री झाले का? तर अजिबात नाही. शहरातील अतिक्रमणांच्या मुद्यावर दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अलीकडेच टीका केली होती. त्यानंतरही मनपाने कोणतेही धोरण निश्चित केले नाही.

शासनाने दहा वर्षांपूर्वी मनपाला पथविक्रेता धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले. शासन आदेशानुसार कारवाई करीत आहोत याचा देखावा करण्यासाठी पथविक्रेत्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. १४ हजार ५०० पथविक्रेत्यांची नोंद झाली. त्यानंतर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट मागील वर्षीपासून रस्त्यावर पथविक्रेता दिसला तर सामानासह हातगाडी जप्त करण्यात येते. हातगाडी चालकांनी गल्लीबोळात फिरून व्यवसाय करावा, असा अजब सल्ला मनपाकडून देण्यात येतोय.

माजी नगरसेवकांनाही दाद नाहीगरीब हातगाडी चालक विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांकडे हातगाडी मिळवून द्या म्हणून आग्रह धरतात. त्यांच्या विनंतीलाही मनपा प्रशासन मान द्यायला तयार नाही. प्रशासन ऐकायला तयार नाही, म्हणून अनेक माजी नगरसेवकांनी विनंती करणेही सोडून दिले. हेच माजी नगरसेवक भविष्यात निवडून आल्यावर नियमांवर बोट ठेवतील, तेव्हा प्रशासनाची पळताभुई थोडी होईल.

दंड आकारून हातगाडी द्यावीरस्त्यावर उभे चारचाकी वाहन जप्त केले तर परत देणार नाही, हातगाडी जप्त केली तर देणार नाही, हे धोरण चुकीचे आहे. यापूर्वी हातगाड्यांचा चेंदामेंदा करण्याचे फर्मान मनपाने सोडले होते. हे सुद्धा नियमाला अनुसरून नाही. मनपाने फेरीवाला धोरण आखावे.- भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका