शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त, प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 12:33 IST

Railway Station Platform Ticket :प्लॅटफाॅर्म तिकीट कमी झाल्याने खिशाला कात्री बंद 

ठळक मुद्देकोरोनामुळे दर केले होते ३० रुपयेराेज सरासरी २५० ते ३०० तिकिटांची विक्री

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Railway Station ) नातेवाईकांना सोडायला जाणे स्वस्त झाले असून, गुरुवारपासून (दि.७) रेल्वे प्लॅटफाॅर्म ( Platform Ticket ) तिकीट दर पुन्हा एकदा १० रुपये करण्यात आले आहेत.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर काेराेनापूर्वी प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी अवघे १० रुपये माेजावे लागत हाेते. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील गर्दी आटाेक्यात राहण्यासाठी देशभरातील रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना साेडण्यासाठी येणाऱ्यांना रेल्वेपर्यंत जाण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ३० रुपये माेजावे लागत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकीट दर पुन्हा एकदा १० रुपये करण्यात आले. मात्र, औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील दर कमी हाेण्याची प्रतीक्षाच करावी लागत होती. अखेर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्व रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकीट दर गुरुवारपासून पूर्ववत १० रुपये करण्यात आले.

राेज सरासरी २५० ते ३०० तिकिटांची विक्रीकाेराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गतवर्षी रेल्वे बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या पॅसेंजर रेल्वे वगळता बहुतांश रेल्वे सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दरराेज सरासरी २५० ते ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री हाेते. वर्षभर प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी ३० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी