शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली...! बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांचा फुटला बांध
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
4
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
5
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
6
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
7
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
8
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
9
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
10
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
11
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
12
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
13
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
14
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
15
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
16
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
17
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
19
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
20
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 

कडब्यापेक्षा ज्वारी स्वस्त

By admin | Updated: April 20, 2015 00:36 IST

राजेश खराडे , बीड यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे

राजेश खराडे , बीडयंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे. तर कडबा २५०० रुपये शेकड्यावर जाऊन पोहचलाय.सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला बळीराजा खळ्यावरील ज्वारी लगेच आडतीवर घालीत असल्याने गेल्या पंधरवाड्यात ज्वारीची आवक तिपटीने वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने ज्वारीच्या दराची घसरण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीपाबरोबर रब्बी हे दोन्ही हंगाम गेले. उत्पन्नातून उत्पादनावर केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. एक ना अनेक समस्यांचा सामना करीत शेवटी ज्वारीचे अल्पशा प्रमाणात का होईना उत्पादन झाले आहे. एकरी ८ पोत्याचा उतारा ३ पोत्यावरच येऊन ठेपल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेती व्यवसायातून बळीराजाला आर्थिक फटकाच अधिक प्रमाणात बसला आहे. सध्या लग्नसराई व दरडोईच्या खर्चापोटी शेतकरी शेतीमाल डायरेक्ट बाजारपेठेत आणून विक्री करीत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील सर्वच पिकांची आवक वाढली आहे. जानेवारी महिन्यात ज्वारीच्या केवळ ४ ते ५ पोत्याची आवक होत होती. उत्पादन हाती लागताच येथील बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ज्वारीची ३०० ते ४०० पोत्यांची तर गव्हाची ७० ते ८० पोत्यांची आवक होत आहे. वाढत्या अवकाळीचा परिणाम दरावर झाला असून उत्पादन अल्प प्रमाणात झाले असले तरी शेतकऱ्यांनी विक्रीची घाई गडबड केल्याने ज्वारीला १६०० रु. क्विंटल तर गव्हाला २५०० रु क्विंटल दर मिळत आहे. आवक घटताच दरात वाढ होणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल विकण्याची गडबड करू नये, असा सल्ला जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.अन बाजार समिती गजबजलीखरीप हंगामातील उत्पादनाची आवक झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ओसाड पडली हाती. गेल्या पंधरवाड्यापासून रब्बी हंगामातील बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची आवक वाढल्याने समिती परिसरात दुपारी १२ पर्यंत सौदे होऊ लागले आहेत. चौसाळा, राजुरी, पिंपळनेर, मांजरसुंबा, पाली भागातील शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.