या कार्यक्रमांतर्गत पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ८ महादेवास अभिषेक व पूजा ८ ते ९ सत्यनारायण पूजा पार पडली. नंतर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ह.भ.प. समाधान महाराज रेलगावकर यांचे कीर्तन व प्राचार्य नामदेवराव चापे यांचे प्रवचन झाले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ह.भ.प वैजीनाथ महाराज, वामन नाना, माणिक महाराज, पंढरी महाराज, प्रभू महाराज, जगन महाराज, बापू महाराज, परमेश्वर महाराज आदींसह भाविक उपस्थित होते.
मुर्डेश्वर येथे चातुर्मास समाप्ती कार्यक्रम
By | Updated: December 2, 2020 04:11 IST