शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक काळात औरंगाबादेत चार्टर विमानांच्या घिरट्या; १० दिवसात २२ वर विमानांची लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:42 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग आणि टेकऑफ झाले.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शहरात प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारसंघांत पोहोचण्यासाठी बहुतांश नेत्यांनी चार्टर विमानांतून प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत २२ वर चार्टर विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग आणि टेकऑफ झाले.

शहरात लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या सभांसाठी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आ. राजाभय्या, बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, पंजाब सरक ारमधील क ाँग्रेसचे मंत्री तथा माजी क्रि के टपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते आले होते. 

पक्षांतील वरिष्ठ नेत्यांना पाचारण करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्य दिले जाते. प्रत्येक उमेदवार पक्षासाठी महत्त्वाचा असल्याने नेतेमंडळींनी प्रचारासाठी आयोजित सभांसाठी आवर्जून हजेरी लावण्यावर भर दिला. वेळ वाचविण्यासाठी हवाई साधन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकाच दिवसांत कमीत कमी वेळ अनेक ठिकाणी हजर राहण्यासाठी चार्टर विमानांचा वापर करण्यावर भर देण्यात आला. औरंगाबादेत आलेले अनेक नेते चार्टर विमानाने शहरात दाखल झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत विमानतळ चार्टर विमानांच्या उड्डाणांनी गजबजून गेले होते. 

जालना येथे सभेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेदेखील विमानाने दाखल झाले होते. मागील दहा दिवसांत २२ पेक्षा अधिक चार्टर विमानांची ये-जा झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

खर्च वाचविण्यासाठी शक्कलनिवडणुकीत हवाई खर्च दाखविला जात नाही, अशी ओरड होते. त्यामुळे चार्टर विमानांच्या उड्डाणांवर नजर ठेवली जात आहे. क ोणत्या पक्षाचे नेते कुठून आले, कसे आले, यासंबंधीची खातरजमा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. यावर शक्कल एकाच विमानातून दोघांचा प्रवास, उद्योजक मंडळींच्या विमानातून प्रवास करण्यास पसंती दिली गेल्याचे समजते. शहरात एखादा नेता प्रचारासाठी चार्टर विमानाने आला तर त्यासंबंधीचा खर्च नेत्यांकडे की उमेदवारांकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ