शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये चाँदभाई बनवताहेत ५५ फुटी रावण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 19:12 IST

रावणाचे महाकाय रूप साकारण्यासाठी खास उत्तर प्रदेशातील चाँदभाई व त्यांचे सहकारी मागील १० दिवसांपासून शहरात वास्तव्याला आले आहेत. 

औरंगाबाद : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच वेळी दुसरीकडे विजयादशमीचीही तयारी सुरू झाली आहे. यंदा ५५ फूट व ४५ फूट उंचीचे दोन रावण तयार होत आहेत. रावणाचे महाकाय रूप साकारण्यासाठी खास उत्तर प्रदेशातील चाँदभाई व त्यांचे सहकारी मागील १० दिवसांपासून शहरात वास्तव्याला आले आहेत. 

मनामनातून दुष्टप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी विजयादशमीच्या दिवशी रावणरुपी पुतळ्याचे दहन केल्या जाते. यासाठी रावणाचा महाकाय पुतळा तयार केला जातो. तो एका दिवसात तयार होत नाही. एवढेच नव्हे तर बांबू, कागदापासून पुतळे तयार करण्यासाठी खास या क्षेत्रातील एक्स्पर्टची मदत घेतल्या जाते. रावण बनविण्यात हातखंडा असलेल्या उत्तर प्रदेशातील बुुलंद जिल्ह्यामधील दानपूर या गावातून चाँदभाई मागील १८ वर्षांपासून औरंगाबादेत येत आहेत. सिडको एन-७ येथील रामलीला मैदानावर २५ सप्टेंबरपासून रावण बनविण्यास सुरुवात झाली आहे.

एकाच ठिकाणी दोन रावण बनविण्यात येत आहे. यातील ५५ फूट उंचीचा रावण सिडकोत, तर ४५ फुटांचा रावण वाळूज महानगरसाठी तयार केला जात आहे. दोन्ही पुतळे इको फ्रेंडली आहेत. यासाठी ५०० बांबूचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय वस्त्र, पेपरचा वापर करण्यात येणार आहे. रावण तयार करण्यासाठी २० दिवस लागतात. विजयादशमीच्या आदल्या रात्री रावणाच्या शरीराचे सर्व भाग जोडण्याचे काम सुरू होते व सकाळी क्रेनच्या साह्याने १० डोक्यांचा भाग देहावर बसविला जातो. यासाठी चाँदभाई यांना प्रकाशचंद, कुलदीप वर्मा, राहुलराज, प्रेमपाल, हुसेन अली, सद्दाम अली व इरफानभाई सहकार्य करीत आहेत. 

रावणदहन होताना पाहावत नाहीचाँदभाई म्हणतात, एक रावण तयार करण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतलेली असते. विजयादशमीच्या दिवशी अवघ्या ५ ते १० मिनिटांत जेव्हा हा पुतळा जळून खाक होतो तेव्हा पाहावले जात नाही. मात्र, दुष्टप्रवृत्तींचा नाश व्हायलाच पाहिजे, त्याचे हे प्रतीकात्मक रावणदहन होय. रावणदहन करून आबालवृद्ध जेव्हा आनंदित होतात तेव्हा आमचेही मन प्रसन्न होते, असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Navratriनवरात्रीAurangabadऔरंगाबादDasaraदसरा