शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

देवगिरी साखर कारखान्याच्या विक्रीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:45 AM

फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना विक्रीच्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेत सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, विभागीय साखर सहसंचालक, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि देवगिरी कारखान्याला नोटीस बजावण्याचे आदेश न्या. आर.एम. बोर्डे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना विक्रीच्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेत सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, विभागीय साखर सहसंचालक, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि देवगिरी कारखान्याला नोटीस बजावण्याचे आदेश न्या. आर.एम. बोर्डे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत.राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी देवगिरी कारखाना व यंत्रसामग्री विक्री करण्यासंदर्भात ९ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती. या नोटिसीला विरोध करीत देवगिरी कारखान्याच्या कामगार युनियनने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. ही नोटीस नियमाच्या विरोधात आहे. ती रद्दबातल करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ८३ हेक्टर जागेची आजची किंमत ५० कोटी आहे आणि यंत्रसामग्रीची आजची किंमत ४० कोटी आहे, तरीही हा कारखाना विकताना त्याची किंमत नोटीसमध्ये ४२.५५ कोटी इतकीच ठेवली आहे. यालाही याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.या कारखान्याची सावंगी आणि चौका येथे जमीन आहे. या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेबरोबरच बडोदा बँकेचेही कर्ज आहे. बडोदा बँकेने डीआरटीकडे धाव घेतली आहे. न्यायालयाने नेमलेल्या वसुली अधिकाºयाने कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात राज्य सहकारी बँक, समर्थ सहकारी साखर कारखाना आणि निफाड सहकारी साखर कारखाना यांनी आक्षेप अर्ज दाखल केला आहे. देवगिरी कारखान्याने ही जागा विकू नये म्हणून अर्ज दाखल केला होता. ही जागा विकण्यास राज्य सहकारी बँकेने सहमती दर्शविली होती. सावंगी येथील ६२.५० हेक्टर जमीन विक्री साखर सहसंचालकाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने २९ नोव्हेंबर २०११ रोजी दिले होते. साखर सहसंचालकाने सावंगीच्या जागेच्या मालमत्तेचे मूल्य ठरविले. साखर सहसंचालकांनी जागा विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली.या निविदेला २०१२ मध्ये आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान, आणखी एक याचिका देवगिरीच्या सभासदाने खंडपीठात दाखल केली. त्यांनी १२ एप्रिल २०१७ च्या निविदेला आव्हान दिले आहे.