शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:07 IST

लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील १९३६ मतदान केंद्रांपैकी ७८ केंद्रांवर वीज, पाणी, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ज्या मतदान केंद्रांवर भौतिक सुविधा नाहीत, त्या केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीची लगबग : प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रनिहाय माहितीचे संकलन

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील १९३६ मतदान केंद्रांपैकी ७८ केंद्रांवर वीज, पाणी, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ज्या मतदान केंद्रांवर भौतिक सुविधा नाहीत, त्या केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.सूत्रांनी सांगितले की, ७८ केंद्रांवर वीजपुरवठा नाही. तेथे वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कंपनीला सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात निवडणुका असल्यामुळे मतदान केंद्रावर वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. शिवाय इंटरनेट सेवा सुरळीत मिळावी, यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांशी २ महिन्यांपूर्वी चर्चा झाली आहे. मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून काही माहिती घ्यायची असल्यास इंटरनेट सेवा महत्त्वाची असेल. त्यामुळे प्राधान्याने त्यासाठी तयारी केली आहे. पाणीपुरवठा प्रत्येक मतदान केंद्रावर करता येईल, कर्मचाऱ्यांसह मतदारांसाठीदेखील पाणी उपलब्ध होईल, यासाठी आढावा घेण्यात आला आहे. उन्हाळ्यामुळे मतदान केंद्राबाहेर सावलीची व्यवस्था व्हावी, यासाठी शेड टाकण्यात येणार आहेत. बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत.२३ एप्रिल रोजी मतदान आहे, तोपर्यंत नियोजन करण्यासाठी कालावधी आहे. पाणी, वीज, इंटरनेट सेवा तत्पर ठेवण्याचे सध्या आव्हान असले तरी त्या सुविधा देण्यासाठी तयारी केली जात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार आहेत. १० एप्रिलपर्यंत यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे.मतदारसंघातील मतदान केंद्रविधानसभा मतदारसंघ केंद्रकन्नड ३५१औरंगाबाद मध्य ३१२औरंगाबाद पश्चिम ३३६औरंगाबाद पूर्व २९२गंगापूर २९९वैजापूर ३४६एकूण १९३६

टॅग्स :Electionनिवडणूकwater scarcityपाणी टंचाई