शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या राजधानीत आव्हाने, अपेक्षांच्या डेपोत अडकलेय मनसेचे इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 12:08 IST

Raj Thackeray २२ महिन्यानंतर पक्षप्रमुख शहरात आले आहेत, यापुढे संघटन वाढीची कशी धोरणे असतील, हे आगामी काळात समोर येईल.

- विकास राऊत

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण (MNS ) स्थापन करताना उत्साहाने ओथंबलेले चेहरे आणि स्वप्नांनी चमकणाऱ्या डोळ्यांतून आता खूप काही वजा झाले आहे. स्थापनेपासून सोबत असलेल्या अनेकांनी मनसेची साथ सोडली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत अपेक्षांच्या डेपोत अडकलेले मनसेचे इंजिन आगामी काळात कुठे आणि कसे धावणार, हे मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा पदाधिकारी आढावा बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

विभागासह राजधानीत मनसेच्या रोपट्याला सुरुवातीला पालवी फुटली. परंतु काळाच्या ओघात खतपाणी न मिळाल्यामुळे त्या रोपाचा वटवृक्ष होऊ शकला नाही. मराठवाड्यात सुमारे १५०० पदाधिकारी सध्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जि.प., पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या राजकारणाची घडी विस्कटली आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी मनसेप्रमुख ठाकरे काय करिष्मा करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१२ मध्ये मनसेचे १३ आमदार, नाशिकचा महापौर, मुंबईत २८ नगरसेवक आणि राज्यभरात दोनशेहून जास्त लोकप्रतिनिधी होते. पण ही ताकद फार काळ टिकली नाही. मराठवाड्यात तर पक्षाने बाळसेच धरले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात थोडीफार ताकद निर्माण झाली, परंतु काळाच्या ओघात एकेक बुरुज ढासळत गेल्याने, पक्षाला नवसंजीवनी मिळाली नाही. स्थानिक पातळीवर गटबाजी, कुरबुरी, निवडणूक न लढण्याचे निर्णय यासारखे अनेक कारणांमुळे संघटना मुख्य प्रवाहात आलीच नाही.

मनसेनेला जिल्ह्यात काय मिळाले ?जिल्ह्यात १ आमदार , १ नगरसेवक, ८ जिल्हा परिषद सदस्य, १२ पंचायत समिती सदस्य ही ताकद २००६ नंतर मनसेला मिळाली होती. कन्नडमधून आमदार झालेले नंतर पुढे शिवसेनेत गेले. नगरसेवक भाजपत गेला. २०१२ नंतर अनेक ‘हुकुमी’ निर्णयांमुळे पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढली नाही. २०१५ च्या मनपा निवडणुका लढल्या नाहीत. त्यामुळे शहरी अणि ग्रामीण राजकारणात मनसेची होती-नव्हती, ती ताकदही संपली. वारंवार कार्यकारिणी बरखास्त करणे, मुंबईतूनच संघटना चालविण्याचे प्रकार घडत गेले, त्यामुळे अनेकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. २२ महिन्यानंतर पक्षप्रमुख शहरात आले आहेत, यापुढे संघटन वाढीची कशी धोरणे असतील, हे आगामी काळात समोर येईल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद