शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नवनिर्वाचित ९ खासदारांच्या निवडीला खंडपीठात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:50 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या९ खासदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘निवडणूक याचिका’ दाखल झाल्या आहेत. खंडपीठातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती या याचिका सुनावणीसाठी संबंधित न्यायपीठांकडे वर्ग करतील. त्यानंतर या निवडणूक याचिकांवरील सुनावणी सुरू होईल.

ठळक मुद्देमराठवाड्यातील सर्वच खासदारांविरुद्ध याचिका

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या९ खासदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात ‘निवडणूक याचिका’ दाखल झाल्या आहेत. खंडपीठातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती या याचिका सुनावणीसाठी संबंधित न्यायपीठांकडे वर्ग करतील. त्यानंतर या निवडणूक याचिकांवरील सुनावणी सुरू होईल.औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, परभणीचे खासदार संजय जाधव, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे आणि नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्याविरुद्ध या निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत.औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पराभूत उमेदवार शेख नदीम यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, धर्माच्या आधारे मतदानाचे आवाहन करणे, खर्च लपविणे आदी आक्षेप याचिकेत घेण्यात आले आहेत.बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत आव्हान दिले. डॉ. मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा त्यांचा आक्षेप आहे.नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्याविरुद्ध शंकर वसावे यांनी अ‍ॅड. ज्ञानेश्वर बागूल यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. यामध्ये, त्यांनी ज्या बॉण्डपेपरवर शपथपत्र सादर केले तो बनावट आहे, त्यांनी शपथपत्र पूर्ण भरलेले नाही, अनेक जागा रिकाम्या सोडल्या आहेत. त्यांच्यावर अवलंबितांची चुकीची नावे दिली असून, यात वडील माजी मंत्री विजयकुमार गावित आणि आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या, हे दाखवून देण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड केलेले नाहीत, आदी आक्षेप घेतले आहेत.उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध मनोहर अनंतराव पाटील, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध डॉ. शरदचंद्र वानखेडे, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याविरुद्ध यशपाल शिंदे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध मोहन फत्तूसिंग राठोड, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याविरुद्ध आलमगीर खान आणि लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्याविरुद्ध रामराव गारकर यांनी विविध आक्षेप घेणाऱ्या याचिका सादर केल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९