शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधी खर्चाचे आव्हान; ढिसाळ कारभारामुळे मागील वर्षातील निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:58 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. 

औरंगाबाद :  मागील आर्थिक वर्षातील बहुतांश अखर्चित निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. 

साधारणपणे दरवर्षी सिंचन आणि समाजकल्याण विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे या दोन्ही विभागांच्या बैठका घेऊन खर्चाच्या नियोजनासाठी तगादा लावतात. याही वर्षी वेळेत निधी खर्च झाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने विभाग प्रमुखांकडे तगादा लावलेला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना सोलार वॉटर हिटर पुरविण्यासाठी २५ लाख रुपये, दलित वस्त्यांना कचराकुंडी पुरविण्यासाठी २५ लाख रुपये, वसतिगृहांना सोलार वॉटर हिटर पुरविण्यासाठी २० लाख रुपये, मागासवर्गीय शेतकऱ्यांना ठिबक संच पुरविण्यासाठी ३० लाख रुपये, मागासवर्गीयांना दूध व्यवसायासाठी गाय-म्हैस पुरविण्यासाठी ३० लाख रुपये, मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये ग्रीन जीम बसविण्यासाठी २७ लाख रुपये, रेशीम शेतीसाठी ३५ लाख रुपये आदी योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

तथापि, गेल्या आर्थिक वर्षातील वैयक्तिक योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या लाभार्थ्यांना संबंधित योजनांतर्गत बाजारातून अगोदर स्वत:च्या पैशातून साहित्य खरेदी करायचे आहे; पण दोन महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांनी साहित्य खरेदी केलेले नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

यासाठी समाजकल्याण विभागाने २० आॅगस्ट ही ‘डेडलाईन’ दिलेली आहे. अगोदरचाच निधी अजून खर्च न झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षातला निधी कधी खर्च व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, दर आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी खर्चाचा आढावा व नियोजनाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी बैठका घेत आहेत. सोमवारी २० आॅगस्ट रोजीदेखील याच विषयावर जिल्हा परिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिनाभरात निधी मार्गी लागेलयासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षातील बऱ्याच योजना मार्गी लागल्या आहेत. येत्या महिनाभरात २ ते अडीच कोटी निधी खर्च होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षातील समाजकल्याण विभागाच्या काही योजना मार्गी लागल्या आहेत. वेळेच्या आत योजना मार्गी लावण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे यंदा कोणताही निधी अखर्चित राहाणार नाही.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना