शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

समृद्ध साहित्य निर्मितीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:53 IST

समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : समृद्ध साहित्याचे वाचन माणसाला मर्यादांपासून दूर घेऊन जाते. यासाठी समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली.मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने रविवार, २० आॅगस्ट रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सातव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अंबादास जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे शाखाध्यक्ष अमर हबीब, व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अ‍ॅड. शरद लोमटे, मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य दगडू लोमटे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, मावळते अध्यक्ष श्रीहरी नागरगोजे, ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष जि.प.चे सभापती राजेसाहेब देशमुख, साहित्यिका शीतल बोधले, डॉ. सा.द. सोनसळे उपस्थित होते.पुढे बोलताना न्या. जोशी म्हणाले, निकोप लोकशाहीसाठी मतभिन्नता हवी हे सांगून साहित्य क्षेत्रात वकील बांधवांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या थोर राजकारण्यांची परंपरा लाभलेली आहे. साहित्यक्षेत्राला वृद्धिंगत करण्यासाठी यशवंतरावांचे योगदान विसरता येणार नाही. यशवंतरावांच्या विचारांचा वारसा ज्या राजकारण्यांनी जोपासला, त्या व्यक्तींची राजकीय विमाने आजही आकाशात उंच उडत आहेत. माणसाचा माणसाशी संबंध तुटू नये. याची काळजी साहित्यिकांनी घेतली पाहिजे. परस्परांमध्ये संपर्क व समन्वय न झाल्यास बौद्धिक क्षमता कमी होते, असे जोशी म्हणाले. साहित्य संक्रमित करण्याची पद्धती विकसित झाली पाहिजे. साहित्यिकांनी निर्माण केलेली साहित्यकृती ही पोटच्या अपत्याप्रमाणे असते. मात्र हे अपत्य सुदृढपणे समाजासमोर गेले पाहिजे. याची दक्षताही साहित्यिकांनी बाळगली पाहिजे. आपले लेखन वाचकांना कसे भावेल? हा उद्देश साहित्यातून प्रकट व्हावा. सामाजिक वेदना , सामाजिक जाणिवा व मतभिन्नता दूर करून निकोप साहित्य निर्मिती करण्याचे आव्हान नवसाहित्यिकांसमोर असल्याचे ते म्हणाले. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडावी असे आवाहन माजी न्या. अंबादास जोशी यांनी केले.संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलनाने सातव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. मावळते अध्यक्ष श्रीहरी नागरगोजे यांनी नूतन अध्यक्षांकडे आपला पदभार सोपवला.मान्यवरांचे स्वागत संमेलनाच्या स्वागताध्यक्षांच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डॉ. वैशाली गोस्वामी यांनी केले. आभार अ‍ॅड. पी. जी. जवळबनकर यांनी मानले.