शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चेनस्नॅचर पुन्हा सक्रीय, पाेलिस असल्याचे सांगत सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या पत्नीस लुटले

By सुमित डोळे | Updated: August 26, 2023 20:15 IST

सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय, पाच दिवसांमधली तिसरी घटना

छत्रपती संभजीनगर : 'आम्ही पाेलिस आहोत, अंगावरील दागिने पर्स मध्ये ठेवा', असे सांगत सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशाच्या पत्नीचे तब्बल ११ ताेळे सोने लुटून नेले. दर्गा रस्त्यावर शनिवारी सकाळी नऊ वाजता ही धक्कादायक घटना घडली, हे विशेष. गेल्या पाच दिवसांमधली ही महिलांच्या लुटमारीची तिसरी घटना आहे. पोलिसांसमोर आता सोनसाखळी चोरांना पकडण्याचे नव्याने आव्हान उभे राहिले आहे.

सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय राजे व त्यांची पत्नी सुनिता (६०) हे उल्कानगरीत राहतात. शनिवारी सुनिता दूध डेअरीवर जाण्यासाठी पावणेनऊ वाजता घराबाहेर पडल्या. रोपळेकर रुग्णालयामार्गे त्या डेअरीवर पोहोचल्या. त्याच वेळी त्यांच्याजवळ दोन दुचाकीस्वार गेले. 'आजी, आम्ही पोलिस आहोत, वरिष्ठांच्या सूचना आहेत, अंगावर एवढे दागिने घालू नका, सर्व दागिने पर्समध्ये ठेवा', असे सांगितले. सुनिता यांनी विश्वास ठेवत अंगावरील ११ तोळे दागिने पर्समध्ये ठेवले. ते ठेवताच क्षणार्धात चोरांनी ती पर्स जोरात ओढून सुसाट पसार झाले. त्यानंतर खऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पाच दिवस, तीन घटनादुचाकी चोरी, मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना सुरू असताना आता सोनसाखळी चोरही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झाले असून पुन्हा महिलांना लक्ष्य केले आहे.

-पहिली घटना२० ऑगस्ट रोजी बजाजनगरमध्ये जयश्री जावळे या मुलासह स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी गेल्या असताना त्यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र चोरांनी लंपास केले.

-दुसरी घटनादीपनगरच्या स्नेहलता सराफ (६५, रा. दीपनगर) या २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता परिसरातील गणपती मंदिरात जात होत्या. तेव्हा दुचाकीस्वार चोरांनी समोरून येत त्यांचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद