शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वार दोन भामट्यांनी लांबविले महिलेचे गंठण व साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 14:26 IST

पाठीमागे बसलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे अर्धे गंठण व १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून धूम ठोकली.

ठळक मुद्देसिडको वाळूजमहानगरातील घटना

वाळूज महानगर : मेडिकलमधून औषधे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व साखळी दुचाकीस्वार दोघांनी लांबविल्याची घटना रविवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सिडको वाळूजमहानगर येथे घडली. दागिने ओरबाडल्यानंतर दुचाकीस्वार भामटे अंधाराचा फायदा घेऊन सुसाट फरार झाले.

मीना प्रल्हाद घुले (५५, रा. सिडको वाळूजमहानगर) या रविवारी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुलगी अमिता संतोष मोरे यांना सोबत घेऊन मेडिकल स्टोअर्सवर गेल्या होता. औषधी घेऊन दोघी मायलेकी घराकडे पायी जात असताना सिडको कार्यालयालगतच्या कबीर कोर्ट फंक्शन हॉलजवळ पाठीमागून आलेल्या भामट्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्याने मीना घुले यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व सोन्याची साखळी ओरबाडली. प्रसंगावधान राखत मीना घुले यांनी गंठण हाताने पकडून ठेवल्याने गंठणाचा अर्धा भाग व सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीस्वार पसार झाले. त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. अ‍ॅड. प्रल्हाद घुले व अन्य नागरिकांनी तिकडे धाव घेतली. नागरिकांनी सिडको वाळूजमहानगर परिसरात दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्याचा शोध घेतला.

हे भामटे काळ्या रंगाच्या स्पोर्ट दुचाकीवरून आले होते. पाठीमागे बसलेल्या भामट्याने मीना घुले यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे अर्धे गंठण व १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून धूम ठोकली. विशेष म्हणजे दोघांनी का‌‌‌ळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसेच विनामास्क होते. दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र लांबविल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ व पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. मंगळसूत्र लांबविताना भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची शक्यता असल्याने या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी अ‍ॅड. प्रल्हाद घुले यांच्या तक्रारीवरून मंगळसूत्र चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद