शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चहल यांची उपमहापौरांविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:55 IST

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी बुधवारी रात्री उपमहापौर विजय औताडे यांच्या विरोधात सभागृहात डांबून ठेवत संचिकांवर सह्या घेतल्याची तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी बुधवारी रात्री उपमहापौर विजय औताडे यांच्या विरोधात सभागृहात डांबून ठेवत संचिकांवर सह्या घेतल्याची तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान एमजीपीमधून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आलेल्या चहल यांना कार्यमुक्त करून त्यांना त्यांच्या विभागात परत पाठविण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.अधिका-यांनी मर्यादेत राहण्याचा इशारा गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला असून, पाणीपुरवठ्याच्या संचिकांवरून पालिकेत सुरू असलेल्या संघर्षाने राजकारणाचे वळण घेतले आहे.मंगळवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना उपमहापौरांनी चहल यांना महापौरांच्या दालनात एक तास बसवून ठेवत धक्काबुक्की करीत पाणीपुरवठ्याच्या संचिकांवर सह्या करण्यास भाग पाडल्याच्या घटनेने पालिकेत प्रशासनविरुद्ध सत्ताधारी असा वाद पेटला आहे. त्यामुळे चहल यांनी उपमहापौरांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अद्याप पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले, चहल यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. हा विषय मनपाच्या सभेशी संबंधित आहे. अर्जाची चौकशी सुरू आहे.चहल यांनी बुधवारी रात्री सिटीचौक पोलीस ठाणे गाठून औताडे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे.पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यावरून कारवाईचा काहीही निर्णय घेतला नव्हता. दरम्यान कोणतेही पुरावे नसताना तक्रारीची दखल घेण्यात येऊ नये, याबाबत महापौर पोलीस आयुक्तांशी बोलणार आहेत. याप्रकरणी चहल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी उपमहापौरांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर उपमहापौरांशी या प्रकरणी संपर्क झाला नाही.पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री पावणेबारा वाजेपर्यंत चहल दाम्पत्य होते. चहल यांच्या पत्नीसोबत एका कंत्राटदाराने अरेरावीची भाषा केल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याची तयारी केली होती. चहल हे सिटीचौक पोलीस ठाण्यातून पुंडलिकनगर ठाण्यात आले. तत्पूर्वी काही गुंड त्यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात आले होते. त्या गुंडांनी माध्यम प्रतिनिधींसोबत हुज्जत घातली. आपसात हे प्रकरण मिटल्याने तक्रार दाखल झाली नाही. चहल यांच्या बंगल्याच्या बांधकाम व्यवहारातून वाद झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी