शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत सोहळा, सर्वत्र 'राममय' वातावरण; पोस्टाच्या रामायणावरील तिकिटाच्या स्मृती उजागर

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 16, 2024 12:13 IST

भारतीय पोस्ट विभागाने २२ सप्टेंबर २०१७ या दिवशी ‘रामायणावर’ आधारित प्रकाशित केलेले एकत्रित मिनिचेयर शीट.

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त देशभरात ‘राममय’ वातावरण निर्माण झाले आहे. कोणी अखंड ‘रामनाम’ जप करीत आहे, तर कोणी त्यांच्याकडील ‘श्रीराम दरबार’ची प्राचीन नाणी दाखवत आहे. भारतीय डाक विभागाने तर ७ वर्षांपूर्वीच तिकीट व पाकिटावर ‘रामायण’ साकारून शंखनाद केला होता. तिकिटांचे संग्राहक सुधीर कोर्टीकर यांनी अशा ११ तिकिटांचा संग्रह करून ठेवला आहे. खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी त्यांनी हा दुर्मीळ खजिना खुला केला आहे.

११ तिकिटे, पाकिटांचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशनपवित्र ग्रंथ ‘रामायण’वर आधारित भारतीय डाक विभागाने पोस्ट तिकिटे व पाकिटाचे प्रकाशन २२ सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसीत तुलसी आश्रम मंदिरात करण्यात आले होते.

रामायणातील ११ प्रसंगभारतीय डाक विभागाने रामायणातील ११ प्रसंग निवडून ते तिकिटावर साकारले. यात राम-सीता स्वयंवर, राम वनवास, केवट संवाद, भरत भेट, श्रीरामाने शबरीकडून उष्टे बोर खाणे, सीतादेवीच्या शोधात जटायूशी भेट, रावणाशी युद्धासाठी लंकामध्ये जाण्याकरिता समुद्रावर सेतू तयार करणे, अशोक वाटिकेमध्ये माता सीतेला श्रीरामाचा संदेश पोहोचविणारा हनुमान, लक्ष्मणाला वाचविण्यासाठी हनुमानाने संजीवनी बुटी आणण्याचा प्रसंग, रावण वध व श्रीरामाचा राज्याभिषेक, असे ११ प्रसंग त्यात नमूद करण्यात आले आहेत.

७ लाख तिकिटे विक्रीभारतीय डाक विभागाने ३ लाख मिनियेचर प्रिंटेड शीट्स (११ तिकिटांचे एक शीट) व ७ लाख मुद्रित शीटलेट्स (तिकीट) प्रकाशित केले होते व अल्पावधीत त्यांची विक्री झाली होती. अवघ्या ६५ रुपयांत ११ तिकिटांचा संच मिळत होता. यास प्रथम दिवस आवरण/ विवरणिका असे म्हटले जाते. प्रासंगिक असल्याने त्यानंतर या तिकिटे व पाकिटांची छपाई करण्यात आली नाही.

रामायणाचे पोस्ट तिकीट आता दुर्मीळमला पोस्टाचे तिकीट जमा करण्याचा छंद आहे. भारतीय डाक विभाग असे प्रसंगानुसार एकदाच तिकीट प्रकाशित करत असतो. प्रासंगिक असल्याने त्यानंतर पोस्टाने तिकीट पुनर्प्रकाशित केले नाही. यामुळे ही तिकिटे दुर्मीळ आहेत.- सुधीर कोर्टीकर, तिकीट संग्राहक

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्याPost Officeपोस्ट ऑफिस