शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य शासनाने निधीसाठी आखाडता हात; महापालिकेला योजनांमधील हिश्श्यासाठी तरतूद करावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 20:12 IST

पालिकेने रक्कम दिली तरच स्वच्छ भारत अभियानासाठी राज्य शासनाकडून पुढील निधी मिळेल, असे शासनाने पालिकेला कळविले

ठळक मुद्दे पैशांचे सोंग करता येत नाही  स्वच्छ भारत मिशनही सापडले आर्थिक संकटात

औरंगाबाद: केंद्र, राज्य शासन आणि मनपाच्या भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी मिशनचा हिस्सा दिला तरच यापुढे निधी मिळेल, असा हिसका केंद्र सरकारने मनपाला दिला आहे. सोबतच राज्य शासनाचे स्वच्छ भारत मिशनही आर्थिक संकटात सापडल्यामुळे मनपासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

महापालिकेने कोरोनाचा लढा नियोजन समिती आणि शासनाच्या अनुदानावर दिला. शहरातील रस्ते आणि बससेवा केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत आल्याने आता स्मार्ट सिटी मिशनसाठी ‘स्व’ हिश्श्याची रक्कम भरा. ही रक्कम भरली तरच अधिकचा निधी दिला जाईल. असे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला ठणकावले आहे. यापुढील निधी मिळण्याची वाट सुरळीत ठेवायची असेल तर पालिकेला २५० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. स्मार्ट सिटीपाठोपाठ स्वच्छ भारत अभियानही संकटात आले आहे. या अभियानासाठी २५ कोटी रुपये रक्कम वाटा म्हणून मनपाला द्यावी लागणार आहे. पालिकेने रक्कम दिली तरच स्वच्छ भारत अभियानासाठी राज्य शासनाकडून पुढील निधी मिळेल, असे शासनाने पालिकेला कळविले असून २५ कोटी रुपयांची तरतूददेखील करावीच लागेल, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

शहराचा समावेश केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये केलेला असून एक हजार कोटींंचे हे मिशन आहे. यात ५०० कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा तर राज्य शासन व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटींचा वाटा आहे. केंद्र सरकारने ५०० पैकी २९४ कोटी तर राज्य शासनाने २५० पैकी १४७ असे ४४१ कोटी रुपये औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिल्याचे कळते. मनपाने २५० कोटींच्या स्वहिश्श्यापैकी एक छदामही स्मार्ट सिटी कामासाठी दिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

एएससीडीसीचे सीईओ काय म्हणाले?मनपा प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एएससीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख कुणालकुमार यांचा मनपाच्या हिश्श्यासंदर्भात फोन आला होता. स्मार्ट सिटीसाठी महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम दिली नाही तर अधिकचा निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मनपासमोर २५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मोठे आव्हान असून यातून मार्ग काढण्यासाठी विचार सुरू आहे.

स्मार्टसिटीचे मिशन असेमिशनचा एकूण खर्च: १ हजार कोटीकेंद्र सरकार शासनाचा वाटा : ५००राज्य शासनाचा वाटा: २५० कोटीमहापालिकेचा वाटा: २५० कोटीआजवर केंद्राने दिले: २९४ कोटीराज्य शासनाने दिले: १४७ कोटीमहापालिकेने दिले: ००.०० कोटीएकूण आलेले अनुदान: ४४१ कोटी 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीGovernmentसरकार