शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

केंद्रीय प्रवेश प्रक्रीया, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरीला सुरूवात

By योगेश पायघन | Updated: September 25, 2022 17:02 IST

विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी आज अखेरची मुदत

औरंगाबाद : राज्यातील चार कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात व्यावसायीक कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेसाठी ऑनलाईन अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. तिन फेऱ्या आणि स्पाॅट ॲडमिशन प्रक्रीया १४ नोव्हेंबर पर्यत चालणार आहे. तर ४ नोव्हेंबर पासुन कृषी पदवी अभ्यासक्रम शिकवणीला सुरूवात होईल.

तात्पुरती गुणवत्ता यादी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जाहीर होईल. त्यावर आनलाईन आक्षेपासाठी ३ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून पहिल्या फेरीसाठी जागावाटप ११ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. त्यासाठी रिपोर्टींगचा कालावधी १२ ते १४ ऑक्टोबर देण्यात आला आहेत. दुसऱ्या फेरीचे जागा वाटप १९ ऑक्टोबर रोजी तर रिपोर्टींग१९ ते २१ ऑक्टोबर, तिसऱ्या फेरीचे जागा वाटप २८ऑक्टोबर तर रिपोर्टींग कालावधी २९ ते ३१ ऑक्टोबर देण्यात आला आहे. ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीत जागा निश्चिती झालेल्या उमेदवारांनी संबंधीत महाविद्यालयात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान उपस्थित राहून कागदपत्रे, आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीतील गुणवत्तेनुसार ४ ते ९ नोव्हेंबर प्रवेश फेरी होईल. प्रवेश फेरीची प्रक्रीया महाविद्यालय स्तरावर रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू राहील असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हटले आहे. 

अनुदानीत ३३८० तर विना अनुदानीत १३,२४० जागाराज्यात नऊ अभ्यासक्रमाच्या ३३८० अनुदानीत जागा आहेत. तर विना अनुदानीत सहा अभ्यासक्रमाच्या १३ हजार २४० जागा आहेत. चार कृषी विद्यापीठाअंतर्गत हे महाविद्यालये कार्यरत आहेत. सर्वाधिक ७४ महाविद्यालयात बीएसस्सी ऑनर्स कृषी या अभ्यासक्रमाच्या ७,८९० जागा ७४ महाविद्यालयात आहेत. तर बी टेक जैव तंत्रज्ञान १६ काॅलेजमध्ये १२५० जागा, बी टेक अन्न शास्त्र २४ काॅलमध्ये १४८० जागा असून १० काॅलेजमध्ये बीएसस्सी उद्यानविद्याच्या ८४० जागा, बीएसस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या १२ महाविद्यालयात ९०० जागा आहेत. तर बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या १५ महाविद्यालयात ८८० जागा आहेत.

अभ्यासक्रम निहाय अनुदानीत जागा अभ्यासक्रम - महाविद्यालय -जागा बीएस्सी (ऑनर्स कृषी) -२२ -२२४८बीएस्सी (ऑनर्स उद्यानविद्या) -६ -३३२बीएस्सी (ऑनर्स वनशास्त्र) -२ -८२बीएस्सी (ऑनर्स समुदाय विज्ञान) -१- ६०बीएसस्सी (ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन)- १ -६०बीएफसी (फिशरी सायन्स) -१ -४०बी. टेक (अन्न शास्त्र) -३ -१६०बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) -५ -३०४बी. टेक (जैव तंत्रज्ञान) -२ -१००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीStudentविद्यार्थी