शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 18:31 IST

भाजप नेत्यांनी दिल्लीत वजन वापरण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्रात वजन असलेल्या भाजपच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आणावा, अशा शब्दांत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.

मंगळवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिराच्या लोकार्पण साेहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. संजय शिरसाठ, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी सभापती राजू वैद्य, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेविका अंकिता विधाते, शिल्पा वाडकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून आवडत्या औरंगाबाद शहरात येता आले नाही. त्याची रुखरुख आहे. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. १९८७-८८ मध्ये सांस्कृतिक मंडळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विराट सभा झाली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजपर्यंत करीत आलोय. तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेवर भगवा फडकतोय. तो उतरणारही नाही. नाट्यगृह काळाची गरज होती. आज ‘संत एकनाथ’ला वेगळा साज चढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मी लवकरच पाहणीसाठी येईन. तत्पूर्वी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले.

विकासकामांसाठी जिद्द हवीगुंठेवारीचा प्रश्न, खराब रस्ते, पाणीप्रश्न सोडविण्यात आला. प्रत्येक विषयात मार्ग निघतोच, त्यासाठी जिद्द असायला हवी. औरंगाबादेत भाषणांमध्ये नागरी विषयांना हात घालताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत असायचा. शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.साेहळ्यास सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यांना पाहून मुख्यमंत्र्यांनी कॅमेरा प्रत्येकावर फिरवायला लावला. हा फोटो काढून मला पाठवा. विकासासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची आपली संस्कृती आहे. मी तिथे असतो तर सर्वांना शाल, श्रीफळ दिले असते. आता येथूनच ई-पुष्प देतोय, त्याचा स्वीकार करावा, असे ते म्हणाले.

विंचू चावला...रंगमंदिराला नाथांचे नाव आहे. मला ‘विंचू चावला’ भारूड आठवतेय. हा वेगळा विंचू आहे. पूर्वी जंतर-मंतरने तो उतरविला जायचा. नाथांची शिकवण आपण आचरणात आणावी. पैठणला संतपीठ करतोय, चांगले उद्यान करतोय, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ