शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

सहा राज्यांतील व्यापाऱ्यांचे केंद्र ‘वडोदबाजार’ !

By admin | Updated: July 1, 2014 01:08 IST

रऊफ शेख , फुलंब्री वडोदबाजारचा आठवडी बाजार सहा राज्यांतील व्यापारी केंद्र बनला आहे.

रऊफ शेख , फुलंब्रीवडोदबाजारचा आठवडी बाजार सहा राज्यांतील व्यापारी केंद्र बनला आहे. महिन्याला सुमारे ३२ कोटींचे खरेदी-विक्री व्यवहार होणाऱ्या या बाजाराने ग्रामपंचायतीला ‘लखपती’ करून टाकले आहे. प्रत्येक सोमवारी हा आठवडी बाजार भरतो. यात प्रामुख्याने जनावरांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बैल, गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. या बाजाराची ख्याती महाराष्ट्रासह कर्नाटक, राज्यस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश येथे पोहोचली आहे. तेथील व्यापारी बैल विक्रीसाठी व शेळ्या खरेदीसाठी येतात.राज्यातील कोल्हापूर, कराड, सांगली, सातारा, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर येथील व्यापारी शेळ्या खरेदीसाठी, तर पुणे, जळगाव, पाचोरा, धरणगाव, शेंदुर्णी, शेगाव, खामगाव, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव येथील व्यापारी शेळ्या विक्रीसाठी आणतात.व्यापारी काय म्हणतात?आठवडी बाजारात सुविधांचा अभाव आहे. येथे व्यापाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, थांबण्यासाठी शेड, पाण्याचे हौद होणे आवश्यक आहे. - गोविंद पांडे, ठेकेदारपरराज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना थांबण्यासाठी निवासस्थान असणे आवश्यक आहे, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.-फजल अहेमद -बंगळुरू (कर्नाटक) बाजारात सिमेंट रस्ते झाले पाहिजेत, रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे.-हनिफ कुरेशी, शेंदुरवादाव्यापाऱ्यांना थांबण्यासाठी यवस्था व्हावी. एवढ्या राज्यांतून व्यापारी येथे येतात, याचा विचार व्हायला पाहिजे.-नूरखाँ, पिशोरशेळ्यांसाठी प्रसिद्धया आठवडी बाजारात राजस्थानातील काठीवाड जातीची शेळी, उस्मानाबादी शेळी, मध्यप्रदेशमधील देशी शेळी मिळते. बीड येथील शेळ्याचे व्यापारी प्रत्येक आठवड्याला हजारो शेळ्या खरेदी करून थेट चेन्नई येथे नेऊन विकतात. राजस्थानमधील प्रसिद्ध बैलही येथेच मिळतो. दूध उत्पादकांना लागणाऱ्या गायी, म्हशीही सहज उपलब्ध होतात. उत्पन्नात पुढे; सोयी-सुविधांत मागेग्रामपंचायतला या बाजारापासून वर्षाकाठी ६० ते ७० लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय इतर बाजार, व्यापारी गाळे यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नात ग्रामपंचायत जिल्ह्यात अग्रेसर असली तरी विकास मात्र असा तसाच आहे. ग्रामस्थांना, व्यापाऱ्यांना सुख-सुविधा नाहीत. बाहेर राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना साधे गेस्ट हाऊसही नाही. बाजारात पिण्याचे शुद्ध पाणी, जनावरांची निटनेटकी व्यवस्थाही नाही.