शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ प्रशासनाची प्रसार माध्यमांवर सेन्सॉरशिप? व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव

By राम शिनगारे | Updated: April 11, 2024 12:03 IST

बातम्या तपासून छापण्याची करणार मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रसार माध्यमांवर सेन्सॉरशिप लावण्याचा ठराव घेण्यात आला आहे. या ठरावानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून बातम्यांची तपासणी केल्यानंतरच त्या प्रसार माध्यमांनी छापाव्यात. त्यासाठीचे पत्र प्रशासनाकडून प्रसार माध्यमांना देण्यात येणार असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी दिली.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी प्रशासकीय इमारतीमध्ये घेण्यात आली. या बैठकीत प्रसार माध्यमांतील बातम्यांमुळे विद्यापीठाची बदनामी होत असल्याचा विषय ऐनवेळी चर्चेला घेण्यात आला. या विषयावर काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडली. प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांना प्रतिबंध घालण्यासाठी खल करण्यात आला. एका सदस्याने तर प्रसार माध्यमांना नोटिसा देण्याची सूचना केली, तर एकाने प्रसार माध्यमांना अधिसभेच्या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रसार माध्यमांमध्ये केवळ विद्यापीठाची वाहवा करणाऱ्याच बातम्या आल्या पाहिजेत, असाच एकूण या चर्चेचा सूर होता. शेवटी विद्यापीठ प्रशासनाने सर्व प्रसार माध्यमांना पत्र पाठवून विद्यापीठाच्या बातम्या छापण्यापूर्वी प्रभारी कुलसचिवांनी तपासणी करून घेतली पाहिजे, असे ठरविण्यात आल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी सांगितले.

याविषयी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यावर मेसेजद्वारे विचारण्यात आले, त्यासही उत्तर मिळाले नाही. शेवटी विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमार्फत कुलसचिवांकडे संपर्क साधला; पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.

बैठकीतच आणीबाणीची आठवणएका व्यवस्थापन परिषद सदस्याने सांगितले की, हा विषय चर्चेला आता तेव्हा विद्यापीठ प्रशासनाची बाजू प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका मांडली. मात्र, जेव्हा तपासणी करून बातम्या छापाव्यात, असा विषय आला तेव्हा १९७५च्या आणीबाणीचीच आठवण झाल्याचे सांगितले. विद्यापीठाला घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्या विद्यापीठात प्रसार माध्यमांवर सेन्सॉरशीप लावण्याचा विषय चर्चेलाच कसा येऊ शकतो, असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण