शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीसाठी थेट ग्रामपंचायतसमोर सरण; संघर्षानंतर प्रशासन नमले, लगेच जागा-निधी मंजूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:05 IST

एका तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांचा चार तास संघर्ष; जागा अन् २० लाख रुपयांचा निधीही जागेवरच मंजूर.

खुलताबाद: गावात सार्वजनिक स्मशानभूमी (दफनभूमी) नसल्याने खांडीपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला जागेवरच आव्हान देत एक अभूतपूर्व आंदोलन केले. अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाकडे आणून सरण रचल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि तातडीने स्मशानभूमीसाठी २० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली.

तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथील २३ वर्षीय तरुण विशाल रोहीदास वाकचौरे याचा रविवारी रात्री वाळूज एमआयडीसी परिसरात अपघाती मृत्यू झाला. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे होते. नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी शेत परिसरात तयारी केली. मात्र, परिसरातील काही लोकांनी त्याला विरोध करत जागेवरून वाद घातला. गावात कुठेच सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने, संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक अभूतपूर्व पाऊल उचलले. त्यांनी थेट खांडीपिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाकडे आणून अंत्यसंस्कारासाठी सरण रचले.

ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये चार तास चर्चाया घटनेची माहिती मिळताच खुलताबाद तालुका प्रशासनात मोठी खळबळ उडाली. नायब तहसीलदार सुभाष पांढरे आणि पोलीस निरीक्षक धनंजय फराटे मोठा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. संतप्त ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये तब्बल तीन ते चार तास प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.

प्रशासनाने घेतली माघार, जागेसह निधीही मंजूरअखेर ग्रामस्थांच्या मागणीसमोर प्रशासनाला झुकावे लागले. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी तातडीने कार्यवाही करत खांडीपिंपळगावात गटनंबर १९४ मध्ये सार्वजनिक स्मशानभूमीसाठी २० गुंठे गायरान जागा उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली. केवळ जागाच नव्हे, तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी लगेचच जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीसाठी १० लाख आणि सुशोभीकरणासाठी १० लाख असे एकूण २० लाख रुपये मंजूर असल्याची माहिती दिली. जागा निश्चित झाल्यानंतर आणि तातडीने साफसफाई केल्यानंतर अखेर दुपारी साडेतीन वाजता तरुणाच्या पार्थिवावर नवीन स्मशानभूमीच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Grief-stricken villagers protest, get land, funds for crematorium approved!

Web Summary : After a youth's accidental death, villagers in Khandipimpalgaon, lacking a crematorium, protested at the Gram Panchayat. Authorities conceded, allocating 20 Gunthas of land and ₹2 million for the facility's construction. The youth's funeral then proceeded at the new site.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgram panchayatग्राम पंचायत