शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत गल्लीबोळात होणार सिमेंट रस्त्यांची कामे; मनपा करणार २५३ पैकी १८० रस्ते गुळगुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:50 IST

महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत

औरंगाबाद : महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील तब्बल १८० कामे सिमेंट रस्त्यांची आहेत. ही सर्व कामे प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेली असल्यामुळे गल्लीबोळातही आता सिमेंट रस्ते करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी जमीनच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती मनपाकडूनच निर्माण करण्यात येत आहे.

यंदा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यामध्ये किमान ६०० कोटी रुपयांची कामे सिमेंट रस्त्यांची आहेत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डात सिमेंट रस्ते करण्यासाठी किमान ४ ते ५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. मतदारांना खुश करण्यासाठी सिमेंट रस्ते हा एकमेव पर्याय नगरसेवकांनी निवडला आहे. सिमेंट रस्ते म्हणजेच विकास, असा समज मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा झाला आहे.

शहरातील ११५ वॉर्डांमध्ये आजही ७० ते ८० ठिकाणी ड्रेनेजचे दूषित पाणी वाहत आहे. ड्रेनेज लाईन बदलण्याची तसदी नगरसेवक घेण्यास तयार नाहीत. २५ ते ३० वसाहतींमध्ये मागील सहा महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे नगरसेवकांचा अजिबात कल नाही. शहरातील लाखो नागरिक ज्या डी.पी. रस्त्यांचा सर्वाधिक वापर करतात त्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही.शहरात महापालिकेच्या ताब्यात ११०० किलोमीटरचे प्रमुख रस्ते आहेत. यामध्ये सर्व मोठ्या रस्त्यांचा समावेश आहे. वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची लांबी जवळपास ३ हजार किलोमीटर आहे.

मागील दोन वर्षांपासून नगरसेवक वॉर्डातील छोटे-छोटे रस्तेही सिमेंटचे तयार करीत आहेत. रस्ते गुळगुळीत होणे ही चांगली बाब असली तरी त्याचे नेमके प्रमाण किती असावे याचा विचारच प्रशासन करायला तयार नाही. अधिकारी नगरसेवकांना खुश करण्यासाठी तर नगरसेवक मतदारांना खुश करण्यासाठी धडाधड सिमेंट रस्ते तयार करण्यावर भर देत आहेत. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा व्हावा एवढीही जागा शिल्लक ठेवायला नगरसेवक तयार नाहीत.

झटपट काम म्हणून...महापालिकेतील बहुतांश कंत्राटदारांनीही आता सिमेंट रस्त्यांच्या कामांकडे मोर्चा वळविला आहे. गल्लीबोळातील सिमेंटच्या रस्त्याचे काम आठ दिवसांत संपते. शहरातील सिमेंट मिक्सर प्लँटमधून रेडिमेड साहित्य आणून एका दिवसात काम संपविता येते. तयार रस्त्यावर फक्त आठ दिवस पाणी पाजल्यावर काम फत्ते होते. दहाव्या दिवशी कंत्राटदार बिल घेऊन मनपाच्या लेखा विभागात हजर असतो.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा